तरुण भारत

श्रीनगर येथील डेनेज वाहिनीचे काम निकृष्ट दर्जाचे

प्रतिनिधी / बेळगाव

स्मार्ट सिटी योजनेंतर्गत श्रीनगर परिसरातील डेनेज वाहिन्या घालण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. पण सदर काम व्यवस्थित होत नसल्याची तक्रार करण्यात आली आहे. काँक्रीट घालण्यापूर्वी ड्रेनेज वाहिन्या घालून काम उरकण्याचा प्रकार चालविला असल्याचा आरोप माजी नगरसेवक दिनेश नाशिपुडी यांनी केला आहे. यामुळे स्मार्ट सिटी योजनेच्या कामात मोठय़ा प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याची तक्रार केली जात आहे.

Advertisements

श्रीनगर परिसराचा विकास स्मार्ट सिटी योजनेंतर्गत करण्यात येत आहे. रस्त्याचे काँक्रिटीकरण, गटारीचे बांधकाम आदींसह विविध कामांची पूर्तता करण्यात आली आहे. डेनेजवाहिन्या घालण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. पण सदर काम देखील व्यवस्थित होत नसल्याची तक्रार नागरिक करीत आहेत. काही ठिकाणी डेनेज वाहिन्या घालण्यासाठी चरी खोदण्यात आल्या, पण वाहिन्या घालण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. तसेच डेनेज वाहिन्या घालताना प्रथम काँक्रीट घालण्याची गरज आहे. डेनेज वाहिन्या घातल्यानंतर वाहनांमुळे दबण्याचा धोका असतो. त्यामुळे डेनेज वाहिनीला गळती लागण्याची शक्मयता असते. त्यामुळे प्रथम काँक्रीट घालूनच डेनेज वाहिन्या घालणे बंधनकारक आहे. मात्र स्मार्ट सिटी योजनेंतर्गत काँक्रीट घालण्याकडे दुर्लक्ष करून डेनेज वाहिन्या घालण्याचे काम सुरू आहे.

सदर काम व्यवस्थित होत नसल्याची तक्रार होत आहे. याबाबत काम करणाऱया कंत्राटदारासह स्मार्ट सिटी कंपनीच्या अधिकाऱयांकडे याबबात तक्रार नोंदवली. पण याकडे दुर्लक्ष करून डेनेज वाहिन्या घालण्याचे काम सुरू ठेवण्यात आले असल्याची तक्रार माजी नगरसेवक दिनेश नाशिपुडी यांनी केली.

स्मार्ट सिटी योजनेंतर्गत विविध कामे राबविण्यात येत आहेत. पण सदर कामांचा दर्जा व्यवस्थित नसल्याचा आरोप नाशिपुडी यांनी केला. स्मार्ट सिटी योजनेच्या नावाखाली निधीचा दुरुपयोग करण्यात येत आहे. कामे निकृ÷ दर्जाची करून निधीमध्ये मोठय़ा प्रमाणात भ्रष्टाचार करण्यात येत असल्याचा आरोप देखील माजी नगरसेवक नाशिपुडी यांनी केला आहे. त्यामुळे स्मार्ट सिटी योजनेंतर्गत राबविण्यात येणाऱया कामाच्या दर्जाची तपासणी करावी, तसेच निकृ÷ दर्जाची कामे केलेल्या कंत्राटदारासह स्मार्ट सिटी कंपनीच्या अधिकाऱयांवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

Related Stories

कर्नाटक : पोलिसांवर केलेल्या वक्तव्याबद्दल गृहमंत्र्यांविरोधात तक्रार

Sumit Tambekar

रस्त्यावर थुंकल्याप्रकरणी तीन मुले पोलिसांच्या ताब्यात

Rohan_P

सीएए-एनआरसी कायदा समर्थनार्थ हमारा देश वतीने जागृती फेरी

Patil_p

निपाणी पोलिसांकडून 10 ट्रक ताब्यात

Patil_p

विश्वशांती संदेश देण्यासाठी शुभम साकेचा बेळगाव-गोवा सायकल प्रवास

Amit Kulkarni

मनपा वॉर्ड पुनर्रचनेबाबत संभ्रम

Patil_p
error: Content is protected !!