तरुण भारत

बेळगुंदी येथे आत्मनिर्भर भारत योजनेचा शुभारंभ

वार्ताहर / किणये

बेळगुंदी येथील सरस्वती महिला स्व-सहाय्य संघ यांच्यावतीने गावात आत्मनिर्भर भारत या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी विविध मान्यवर मंडळी उपस्थित होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलेल्या या योजनेचा पश्चिम भागातील बेळगुंदी गावात प्रारंभ केला असल्यामुळे महिला वर्गातून या उपक्रमाचे कौतुक होत आहे.

Advertisements

संघटनेच्या महिलांच्यावतीने दीपप्रज्वलन करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून डीसीसी बँकेचे संचालक राजू अंकलगी, तालुका मार्केंटिंग सोसायटीचे चेअरमन शंकरगौडा पाटील, व्हाईस चेअरमन शिवनगौडा पाटील, आसिफ मुल्ला, माजी महापौर शिवाजी सुंठकर, तालुका मार्केंटिंग सोसायटीचे संचालक विनय कदम आदी उपस्थित होते. आत्मनिर्भर भारत या योजनेचा लाभ ग्रामीण भागातील जनतेने घ्यायला हवा. डीसीसी बँकेच्यावतीने या योजनेसाठी सरकारच्यावतीने आर्थिक पुरवठा करण्यात येत असल्याची माहिती राजू अंकलगी यांनी
दिली.

यावेळी अंकलगी यांच्यासह शंकरगौडा पाटील, शिवनगौडा पाटील, विनय कदम आदींचा सत्कार करण्यात आला. बेळगुंदी येथील आत्मनिर्भर संघ अध्यक्षा शारदा आमरोळकर, महिला फेडरेशन अध्यक्षा प्रमोदा हजारे, धनश्री सरदेसाई, चेतन पाटील, बळवंत सुतार, शिवप्रसाद पाटील, परशराम तुप्पट, नारायण झंगरुचे, भरत पाटील, अश्विनी पाटील, जोती बोकमुरकर, मोहन आमरोळकर, शिवाजी आमरोळकर, आदी उपस्थित होते.

Related Stories

उड्डाणपुलाचे काम करण्यासाठी कामगारांची चणचण

Patil_p

प्रभारी आहे म्हणून कामात दिरंगाई नको

Amit Kulkarni

वेस्ट फौंड्री सॅन्डमुळे नागरिकांचा जीव धोक्यात

Amit Kulkarni

विश्रुत स्ट्रायकर्स, अर्जुन स्पोर्ट्स हुबळी टायगर्स संघ विजयी

Amit Kulkarni

सुखी संसारासाठी संस्कार महत्त्वाचे

Omkar B

ठिबक सिंचनद्वारे बहरतेय शेती : कमी खर्चात अधिक उत्पादन

Amit Kulkarni
error: Content is protected !!