तरुण भारत

खाण लीज गौडबंगाल प्रकरणी सरकारला नोटीस

लोकायुक्तांच्या आदेशाकडे केले दुर्लक्ष

प्रतिनिधी / पणजी

Advertisements

खाण लीज नूतनीकरण गौडबंगाल प्रकरणी भ्रष्टाचार विरोधी गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेऊन प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवावा, या लोकायुक्तांनी दिलेल्या आदेशाची सरकारने अंमलबजावणी न केल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने त्याची गंभीर दखल घेऊन सरकारला नोटीस बजावली आहे.

लोकायुक्तांनी दिलेल्या आदेशाची पायमल्ली करून त्याची अंमलबजावणी केली जात नाही. त्यामुळे लोकायुक्त पदाची गोव्याला आवश्यकता नाही, न्यायालयाने याची दखल घ्यायला हवी, असे मत लोकायुक्त पदावरून निवृत्त झाल्यानंतर न्या. पी. के. मिश्रा यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले होते.

88 खाणींचे नूतनीकरण बेकायदेशीर

सदर प्रकरण आता मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात न्यायप्रविष्ट झाले आहे. कालबाह्य झालेल्या खाणींचे दुसऱयांदा नूतनीकरण करता येत नाही, असे कायद्यात स्पष्ट असताना गोवा सरकारने घाईगडबडीत दि. 6 जानेवारी 2015 ते 12 जानेवारी 2015 या 6 दिवसात 56 खाणींचे लीज नूतनीकरण केले. दि. 12 जानेवारी 2015 रोजी एकाच दिवशी 31 खाणींचे लीज नूतनीकरण झाले. एकूण 88 खाणींना सरकारने लीज नूतनीकरण दिले होते. सर्वोच्च न्यायालयाने ते बेकायदेशीर ठरवून रद्दबातल ठरवले आहे.

लोकायुक्तांनी एप्रिलमध्ये दिला होता आदेश

सरकारची सदर कृती फौजदारी गुन्हा असून या प्रकरणी सीबीआयद्वारे तपास व्हायला हवा, अशी मागणी करून लोकायुक्तांपुढे तक्रार सादर झाली होती. तत्कालीन मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, खाण सचिव पवन कुमार सेन आणि खाण संचालक प्रसन्न आचार्य यांच्या विरुद्ध भ्रष्टाचार विरोधी पोलीस पथकाने गुन्हा नोंदवून घ्यावा, व प्रकरण तपासासाठी सीबीआयकडे सोपवावे, असा आदेश दि. 15 एप्रिल 2020 रोजी लोकायुक्तांनी दिला होता.

या आदेशाला आव्हान देऊन स्थगिती मिळवण्यात आली नाही, किंवा अंमलबजावणीही करण्यात न आल्याने आता गोवा फाऊंडेशन या संस्थेने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात याचिका सादर केली असून खंडपीठाने सरकारला याचिका दाखल करून घेण्यापूर्वीची नोटीस बजावली आहे.

Related Stories

गोव्याच्या सिंदिया, करिश्मा, वॅलनी भारतीय संभाव्य फुटबॉल संघात

Amit Kulkarni

श्रीधर नाईक यांना लायन्सचा ’उत्कृष्ट विभागीय अध्यक्ष’ पुरस्कार

Amit Kulkarni

कुंकळ्ळीत ‘स्टेप-अप इस्पितळ’ स्थापण्याची तयारी

Patil_p

सूर्याजी महात्मेंची ‘वेषधारी पंजाबी’ पुन्हा वाचकांच्या भेटीस…!

Omkar B

झुआरीनगरच्या पठारावर करडाने घेतला पेट

Patil_p

कोरोनाचा कहर, आता लॉकडाऊन हवेच!

tarunbharat
error: Content is protected !!