तरुण भारत

शिक्षकी पेशाला काळीमा फासणाऱ्या ‘त्या’ शिक्षकास पोलिस कोठडी

प्रतिनिधी / गारगोटी

नांगरगाव इथल्या प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या आठ वर्षीय विद्यार्थींनीचा लैंगिक छळ प्रकरणी शिक्षक सुनिल मारुती चौगले (वय – ४२) याच्यावर भुदरगड पोलिसात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाल्याने त्याला अटक करून आज न्यायालयात हजर केल असता, सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

या शिक्षकाला वाचवण्यासाठी विविध स्तरावर प्रयत्न केल होते. पण आईच्या खंबीर भुमिकेन तडजोडीच सर्व प्रयत्न फसला. भुदरगड तालुक्यातील नांगरगाव प्राथमिक शाळेत मंगळवारी सकाळी ११ ते ३ वाजण्याच्या सुमारास गावातील सर्व विद्यार्थांना कोनवडे येथील प्राथमिक शिक्षक सुनिल मारूती चौगले यांने वर्गामध्ये मुलांना अभ्यासाकरीता बोलावल होते. दुपारी तास संपल्यावर सर्व मुले घराकड जात असताना या शिक्षकाने पिडीतेला थांबण्यास सांगितले. सर्व मुल घरी गेल्याची खात्री झाल्यावर या नराधमाने पिडीत मुलीवर लैंगिक अत्याचार केला व आई वडीलांना घडलेली घटना सांगू नको अस धमकावले.

Advertisements

पण मुलीने घरी गेल्यावर घडलेला प्रकार त्याच दिवशी आईला सांगितला, बुधवारी सकाळी तो शिक्षक शाळेत आल्यावर घडलेला प्रकार ग्रामस्थांना समजल्यावर नातेवाईक व ग्रामस्थांनी यथेच्छ चोप देऊन पोलीसांच्या ताब्यात दिले. हे प्रकरण मिटवण्यासाठी शिक्षक, नेत्यांनी जोरदार प्रयत्न केल होते. पण पिडीत मुलीच्या आईने खंबीर भुमिका घेतल्याने बुधवारी रात्री उशिरा पोक्सो अंतर्गत गुन्हा नोंद करून त्याला अटक करण्यात आली. आज त्याला न्यायालयासमोर हजर केल असता सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

ही घटना समजल्यावर गडहिंग्लज पोलिस उपविभागीय अधिकारी गणेश इंगळे यांनी घटनास्थळी भेट देऊन, या नराधमास कठोर कारवाई केली जाईल. असे आश्वासन दिले. तसेच यावेळी शिक्षकी पेशाला काळीमा फासणाऱ्या शिक्षकास कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी ग्रामस्थ व पालकांनी केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक अमित देशमुख करत आहेत.

Related Stories

कोल्हापूर : शहीद जवान संग्राम पाटील अनंतात विलीन

Abhijeet Shinde

कोल्हापूर : ‘मास्क नाही, प्रवेश नाही’ उपक्रमाचे मुख्यमंत्र्यांकडून कौतुक

Abhijeet Shinde

वाहने -भाजी विक्रेते रस्त्यावर

Abhijeet Shinde

सांगली : मिरजेत डॉक्टराचा बंगला कामगारानेच फोडला

Abhijeet Shinde

सावरवाडी येथे ऊस शेतीस आग; अडीच लाखाचे नुकसान

Abhijeet Shinde

खेळाडूंनी आयपीएलपेक्षा देशाला प्राधान्य द्यावे :कपिल देव

Sumit Tambekar
error: Content is protected !!