तरुण भारत

अमेरिकेच्या निवडणुकीत मराठमोळ्या उद्योजकाचा डंका

मिशिगनमधून श्री. ठाणेदार झाले आमदार

अमेरिका : सध्या संपूर्ण जगाचे लक्ष अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष निवडणुकीकडे लागले आहे. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव होऊन डेमोक्रॅटिकचे उमेदवार जो बायडेन यांचा विजय होण्याची शक्यता आहे. दरम्यान संपूर्ण जगाचं लक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि बायडेन यांच्याकडे असताना मराठी माणसाने जबरदस्त कामगिरी करत सर्वांना आपली दखल घेण्यास भाग पाडलं आहे. श्री ठाणेदार यांनी मिशिगन राज्यातून विजय मिळवत आमदारकी मिळवली आहे.

Advertisements

‘हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह’साठी झालेल्या निवडणुकीत भारतीय वंशाचे उमेदवार श्री ठाणेदार यांनी आमदारकी मिळवली आहे. श्री ठाणेदार यांनी तब्बल ९३ टक्के मतं खिशात घालत ‘रिपब्लिकन पक्षा’च्या उमेदवाराचा पराभव केला आहे. श्री ठाणेदार यांचा २५ हजार मतांनी विजय झाला असून प्रतिस्पर्धी उमेदवाराला फक्त सहा टक्के मतं मिळाली.

श्री ठाणेदार यांनी दोन वर्षांपूर्वी २०१८ मध्ये राज्याच्या गव्हर्नरपदासाठी निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांनी दोन लाखांहून अधिक मतं मिळाली होती. “श्री फॉर व्ही” ही त्यांची प्रचारमोहीम चांगलीच गाजली होती. श्री ठाणेदार मिशिगन यांनी राज्यातून यावर्षी ‘हाऊस ऑफ रिप्रझेंटेटिव्ह’ म्हणजेच विधानसभेची निवडणूक लढवली. त्यांचं एक यशस्वी उद्योजक – ‘ही श्रीची इच्छा’ प्रसिध्द आत्मचरित्र आहे. आजपर्यंत डेमोक्रॅटिक पक्षाचे मोठे देणगीदार असलेले श्री ठाणेदार आता पक्षाचे लोकनियुक्त प्रतिनिधी झाले आहेत.

श्री ठाणेदार हे मूळचे बेळगावचे आहेत. रसायनशास्त्रात त्यांनी पदवी मिळवली आहे. तर मुंबई विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं. नंतर पुढील शिक्षणासाठी १९७९ मध्ये ते अमेरिकेला स्थायिक झाले. त्यावेळी त्यांचं वय २४ होतं. श्री ठाणेदार यांचं “ही ‘श्री’ ची इच्छा” आत्मचरित्र असून यामध्ये त्यांनी आपला संपूर्ण प्रवास उलगडलेला आहे.

Related Stories

हलगा येथे शालेय विद्यार्थिनीचा डेंग्यूने मृत्यू

Amit Kulkarni

फाशीची शिक्षा झालेल्या कैद्याचा आजाराने मृत्यू

Patil_p

महिला सुरक्षा-पोक्सो कायद्याबद्दल मार्गदर्शन

Amit Kulkarni

पडलिहाळ येथे अत्यावश्यक सेवा 112 ची जागृती

Patil_p

स्थानिक लांब पल्ल्याच्या बसेस पूर्ववत सेवेत

Patil_p

टिळकवाडी रेशन गोदामाजवळील गटारी बुजल्या

Amit Kulkarni
error: Content is protected !!