तरुण भारत

महाराष्ट्रात मागील 24 तासात 11 हजारपेक्षा अधिक रुग्ण कोरोनामुक्त!

  • रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 91.7 %


ऑनलाईन टीम / मुंबई :


महाराष्ट्रात मागील 24 तासात 11 हजार 277 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आतापर्यंत 15 लाख 51 हजार 282 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सध्या 91.07 % आहे. 

Advertisements


दरम्यान, मागील 24 तासात राज्यात 5, 246 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 17 लाख 03 हजार 444 वर पोहचली आहे. सध्या 1 लाख 06 हजार 516 रुग्ण उपचार घेत आहेत. गुरुवारी दिवसभरात 117 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. तर मृतांचा एकूण आकडा 44 हजार 804 एवढा आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर 2.63 % आहे.


प्रयोगशाळेत आतापर्यंत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या 92 लाख 50 हजार 254 नमुन्यांपैकी 17 लाख 03 हजार 444 रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 12 लाख 52 हजार 758 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून, 12 हजार 003 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

Related Stories

अब्दुल लाटच्या कन्येची पॅरिस मधील भारतीय दूतावासमध्ये द्वितीय सचिवपदी नियुक्ती

Abhijeet Shinde

सचिन फोलाने यांची भारतीय जनता युवा मोर्चा उपाध्यक्षपदी निवड

Rohan_P

भास्कर जाधव यांच्या ‘त्या’ कृतीवर देवेंद्र फडणवीसांची संतप्त प्रतिक्रिया

Abhijeet Shinde

महाराष्ट्र : कोरोनामुक्त रुग्णांची संख्या 19.59 लाखांच्या उंबरठ्यावर

Rohan_P

राधानगरी धरणाचे दोन दरवाजे चौथ्यांदा उघडले

Abhijeet Shinde

सिव्हिलच्या कोव्हिड सेंटरमध्ये पाण्याचा ठणाणा

Patil_p
error: Content is protected !!