तरुण भारत

दिवाळीत फटाके उडविण्यावर निर्बंध येण्याची चिन्हे

प्रतिनिधी/ बेळगाव

यंदाच्या दिवाळीमध्ये फटाके उडविण्यावर निर्बंध येण्याची चिन्हे दिसत आहेत. कोविड-19 च्या रुग्णांवर फटाक्मयांचा दुष्परिणाम होऊ शकतो हे लक्षात घेऊन सरकार फटाके उडविण्यावर बंदी आणण्याबाबत विचार करत आहे. फटाके उडविल्यानंतर जो धूर निर्माण होतो ते रुग्णांसाठी घातक ठरतो. त्यामुळे फटाके वाजविण्यावर निर्बंध येण्याची चिन्हे आहेत.

रुग्णांचे आरोग्य हे महत्त्वाचे आहे. त्यामुळे फटाक्मयांवर बंदी आणावी का यावर सरकार विचार करत आहे. मात्र अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. मुख्यमंत्र्यांशी चर्चा करूनच या निर्णयावर शिक्कामोर्तब केले जाईल, असे आरोग्यमंत्री के. सुधाकर यांनी सांगितले आहे. राजस्थान सरकारने फटाक्मयांवर बंदी आणली आहे. तर दिल्ली सरकारने पर्यावरणपूरक फटाक्मयांना मान्यता दिली आहे.

फटाक्मयांपासून निर्माण होणारा धूर हा कोविड 19 च्या रुग्णांसाठी घातक ठरू शकतो हे स्पष्ट करून डॉक्टरांनी चिंता व्यक्त केली आहे. या धुरामुळे दमा आणि श्वसन विकार असणाऱया रुग्णांना त्रास होणार आहे. धूर शरिरात गेल्यास फुप्फुसावर परिणाम होऊ शकतो. अशा परिस्थितीत लोकांनी फटाके न वाजविणे श्रेयस्कर ठरेल असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

ज्यांना श्वसनाचा किंवा दम्याचा त्रास आहे. किंवा तीव्र सर्दी पडसे आहे किंवा जे कोरोनामधून बरे होत आहेत अशा सर्वांनी दिवाळीमध्ये फटाक्मयांपासून दूर रहावे असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.

पोस्टकोविड रुग्णांना फटाक्मयांचा त्रास होवू शकतो

सण किंवा उत्सवामध्ये फटाके लावणे ही मुलांसाठी आनंदाची बाब आहे. मात्र यावषी कोरोनाचे संकट लक्षात घेता फटाके वाजविण्याचे टाळलेले बरे. कोरोनातून पूर्णतः बरे झालेल्या रुग्णांना फटाक्मयांचा फारसा त्रास होणार नाही. परंतु पोस्टकोविड म्हणजेच कोरोना बरा होवून सुद्धा काही जणांमध्ये वेगळी लक्षणे आढळत आहेत. त्याला पोस्टकोविड म्हणतात. अशा रुग्णांना फटाक्मयांचा त्रास होवू शकतो. हवेची घनता वाढल्यास जे सक्रिय रुग्ण आहेत त्यांच्या खोकण्यातून काही विषाणू हवेत तरंगत राहतील. त्यामुळे इतरांना त्याचा प्रादुर्भाव होवू शकतो. बऱयाच कोविड रुग्णांच्या श्वासनलिका अकुंचन पावून त्यांची धाप वाढू शकते. दमेकरी रुग्णांची श्वासनलिका अपुंचित झाल्याने त्यांना अधिक त्रास होवू शकतो. त्यामुळे फटाक्मयांच्या धुरांमधून हवेत तरंगणारे विषाणू प्रादुर्भाव वाढवू शकतात. सध्या दिल्लीमध्ये हीच समस्या निर्माण झाली आहे.

कोरोनाची दुसरी लाट येवू नये यासाठी खबरदारी घेणे आवश्यक

बेळगावमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होत आहे. ज्यामुळे लोक निष्काळजीने वागत आहेत. मात्र पुन्हा कोरोनाची दुसरी लाट येवू नये यासाठी पूर्ण खबरदारी आणि काळजी घेणे आवश्यक आहे. बेळगावला दुसऱया लाटेपासून सुरक्षित ठेवायचे असेल तर फटाके टाळणे हितावह ठरेल. त्याचप्रमाणे मास्क वापरणे सामाजिक अंतर राखणे आणि सातत्याने साबणाने हात धुणे या सवयी सोडता कामा नयेत.

Related Stories

स्मार्ट रोडवरील गाळय़ाला 33 हजार रुपये सर्वाधिक बोली

Patil_p

वीज खांब उचलण्याची जबाबदारी कोणाची?

Patil_p

चिकोडीत सीटूचे केंद्राविरुद्ध आंदोलन

Patil_p

निर्मिती करून बससेवा पुरविली जात आहे. बेळगाव-मुंबई विमानसेवा सुरू

Patil_p

कोटपा कायद्याच्या अंमलबजावणीसाठी पोलिसांना प्रशिक्षण

Omkar B

नंदगड येथील संगोळ्ळी रायण्णा यात्रोत्सव उत्साहात

Patil_p
error: Content is protected !!