तरुण भारत

हालसिद्धनाथ यात्रेची पालखी सोहळय़ाने सांगता

वार्ताहर/ कोगनोळी

कर्नाटक, महाराष्ट्रासह अन्य राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या श्री. क्षेत्र कुर्ली – आप्पाचीवाडी (ता. निपाणी) येथील श्री. हालसिद्धनाथ देवाच्या यात्रेची बुधवारी सायंकाळी मानकरी, पुजारी व मोजक्मयाच भाविकांच्या उपस्थितीत सांगता झाली. गेल्या पाच दिवसापासून सुरू असणाऱ्या या यात्रेत नाथांचे अनेक धार्मिक कार्यक्रम, ढोलवादन, वालंग, गजनृत्य, बकरा खेळणे असे विविध धर्मिक कार्यक्रम पार पडले.

मंगळवारी पहाटे नाथांची पहिली तर बुधवारी पहाटे भगवान डोणे (वाघापुरे) यांचे सुपुत्र सिद्धार्थ डोणे यांनी नाथांची दुसरी भाकणूक कथन केली. त्यानंतर सकाळी 7 वाजता घुमट मंदीरात भगवान डोणे महाराज यांची तिसरी अखेरची भाकणूक झाली. गेल्या पाच दिवसात यात्रेसाठी व भाकणुकीसाठी मोजक्मया भाविकांनी हजेरी लावली होती. मंगळवारी दिवसभर महानैवेद्याचा कार्यक्रम झाला.

यावेळी पारंपरिक पद्धतीने सायंकाळी 5 वाजता उत्सवस्थळी ढोलवादन व भंडाऱयाची उधळण करण्यात आली. त्यानंतर नाथांच्या दोन्ही पालख्यांची व सबिण्याची हालसिद्धनाथ व श्री महालक्ष्मी मंदीर प्रदक्षिणा झाली. सायंकाळी 6 वाजता वाडय़ातील मंदिरात नाथांची मूर्ती स्थानापन्न झाली. त्यानंतर कुर्लीतील पालखी सोहळा मार्गस्थ झाला. तत्पुर्वी बुधवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास भगवान डोणे महाराज यांच्या हस्ते प्रमुख मानकऱयांच्या उपस्थितीत कर तोडून पाच दिवस साधेपणाने सुरु असलेल्या यात्रेची सांगता करण्यात आली .ही यात्रा पार पाडण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासन, यात्रा कमिटी, पोलीस प्रशासन यांच्या नियोजनामुळे यात्रा सुरळीत पार पडली.

Related Stories

आत्मनिर्भर योजनेकरिता फेरीवाल्यांचे पुन्हा सर्वेक्षण

Patil_p

शेतकऱयांनी पीक दर्शक मोबाईल ऍपचा वापर करावा

Patil_p

काळय़ादिनी येळ्ळूरमध्ये कडकडीत हरताळ

Patil_p

निपाणीत उरुसास अत्यल्प गर्दी

Patil_p

आरपीडी बीबीएमध्ये स्वागत-परिचय समारंभ

Amit Kulkarni

पावसाचा तडाखा, पिकांना फटका

Patil_p
error: Content is protected !!