तरुण भारत

6 दिवसांत आयुर्वेदिक औषधाने कोरोनामुक्त

आयुर्वेद उपचारपद्धतीचा प्रभाव : ‘फीफाट्रोल’ औषधाची कमाल : इम्युनिटी वाढविते

आयुर्वेदिक औषध फीफाट्रोलद्वारे केवळ 6 दिवसांमध्ये कोरोनाच्या रुग्णाचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. ऑल इंडिया इन्स्टीटय़ूट ऑफ आयुर्वेद (एआयआयए) दिल्लीच्या डॉक्टरांनी आयुर्वेदिक औषध फीफाट्रोलचा वापर कोरोनाबाधितांवर केला आहे. रुग्ण एका आठवडय़ातच संक्रमणमुक्त झाल्याचा दावा डॉक्टरांनी केला आहे. रुग्णाला नैसर्गिक औषधे आणि आयुर्वेदिक उपचारपद्धतीने बरे करण्यात आले आहे.

Advertisements

ऑल इंडिया इन्स्टीटय़ूट ऑफ आयुर्वेदच्या जर्नलमध्ये प्रकाशित अहवालात हा दावा करण्यात आला आहे. दिल्लीत राहणाऱया 30 वर्षीय एक आरोग्य कर्मचाऱयाला कोरोनाचे संक्रमण झाले. त्याला विलगीकरणात राहण्याचा सल्ला देण्यात आला होता. रुग्णात कोरोनाची बहुतांश लक्षणे सौम्य होती.

उपचारादरम्यान त्याला फीफाट्रोलची टॅबलेट्स, शम्समणि वटी, आयुष क्वाथ आणि लक्ष्मीविलास रस देण्यात आला. तसेच आहारात बदल करण्यात आला. याचबरोबर त्याला सत्ववाज्य चिकित्सा देण्यात आली आहे. ही आयुर्वेदात देण्यात येणारी एक सायकोथेरपी असल्याचे अहवालात नमूद आहे.

ही उपचारपद्धत ताप, श्वास घेण्यास त्रास, थकवा, भूक न लागणे, गंध न समजणे यासारख्या लक्षणांसाठी विकसित करण्यात आली होती. उपचार सुरू झाल्याच्या 6 दिवशीच रुग्णाचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. 16 व्या दिवशीही आरटी-पीसीआर चाचणी झाली असून तीही निगेटिव्ह आली आहे.

फीफाट्रोलचे कार्यस्वरुप

आयुर्वेदातील अनेक प्रचलित औषधे आणि हर्ब्स मिळून फीफाट्रोल तयार करण्यात आले आहे. हे औषध रुग्णाची इम्युनिटी वाढविण्याचे काम करते. हे औषध इम्यून सिस्टीमला बळकट करून संक्रमणाचा प्रभाव कमी करते, तसेच यामुळे बरे होण्याचा वेगही वाढत असल्याचे तज्ञांचे मानणे आहे. हे औषध अँटीबायोटिक असले तरीही फ्ल्यू आणि वेदना शमविण्यासही दिले जाते. नॅशनल डेव्हलपमेंट रिसर्च कॉर्पोरेशननुसार फीफाट्रोल नाकाशी संबंधित समस्या, गळय़ात सूज, शरीर आणि डोकेदुखीतही दिलासा देणारे औषध आहे. श्वासनलिकेशी संबंधित संक्रमणाचा उपचार करण्यासाठी या औषधाचा वापर केला जाऊ शकतो. यात अनेक प्रकारचे मायक्रो-न्यूट्रिएंट्स आणि अँटीऑक्सिडेंट्स आहेत.

औषधाची निर्मिती

फीफाट्रोलची निर्मिती आयुर्वेदिक औषधे तयार करणारी भारतीय कंपनी ऐमिल फार्मा करते. यात इम्युनिटी वाढविणाऱया वनौषधी म्हणजेच गुडुची, संजीवनी घनवटी, दारुहरिद्रा, चिरायता, कुटकी, तुलसी, गोदांति भस्म आणि मृत्यूंजर रसचा वापर करण्यात आला आहे. हे औषध विषाणू आणि जीवाणू दोन्हींच्या संक्रमणाशी लढते. या औषधाचे विस्तृत परीक्षण करणे आता अपेक्षित आहे.

अमेरिकेत वेगाने वाढताहेत रुग्ण

अमेरिकेत कोविड-19चे प्रतिदिन नवे रुग्ण अचानकपणे वाढले आहेत. ही स्थिती देशाच्या नव्या अध्यक्षांसाठी चिंतेचा मोठा विषय ठरणार आहे. अमेरिकेत वाढते रुग्ण आणि अधिक संख्येत लोक रुग्णालयांमध्ये दाखल झाल्याने समस्या बिकट होत चालली आहे. 

ट्रम्प यांचा कार्यकाळ किमान 20 जानेवारीपर्यंत चालणार आहे. या 86 दिवसांमध्ये देशाने महामारीला तोंड देण्याच्या पद्धतींमध्ये बदल न केल्यास विषाणूमुळे आणखीन 1 लाख नागरिकांचा जीव जाऊ शकतो, असे उद्गार नॉर्थ-वेस्टर्न विद्यापीठाच्या फीनबर्ग स्कुल ऑफ मेडिसीनमधील ग्लोबल हेल्थ संस्थेचे कार्यकारी संचालक डॉ. रॉबर्ट मर्फी यांनी काढले आहेत. अमेरिकेत निवडणुकीदरम्यान कोविड-19 च्या रुग्णांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. मागील दोन आठवडय़ात कोविड-19 चे नवे रुग्ण सुमारे 45 टक्क्यांपर्यंत वाढले आहेत. मागील 7 दिवसांमधील नव्या रुग्णांची सरासरी 86,352 राहिली आहे. तर विषाणूच्या बळींमध्ये 15 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. प्रतिदिन सरासरी 846 जण जीव गमावत आहेत. जगात कोविड-19 ने सर्वाधिक प्रभावित अमेरिकेत आतापर्यंत 2,32,000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 90 लाखांहून अधिक रुग्ण सापडले आहेत.

Related Stories

ऑस्ट्रेलियाचा प्रवास टाळा : चीन

Patil_p

13 वर्षीय मुलीला बलात्कारामुळे मातृत्व

Patil_p

जगभरात 15 लाख रुग्ण कोरोनामुक्त

datta jadhav

अमेरिकेत 16 वर्षावरील सर्वांना लसीकरण

datta jadhav

किशोरवयीनांना संस्कृतीशी जोडण्याचा पुढाकार

Amit Kulkarni

जगातील सामर्थ्यवान महिलांमध्ये एंजेला मार्केल प्रथम स्थानी

datta jadhav
error: Content is protected !!