तरुण भारत

10 वी, 12 वीच्या परीक्षा मे पूर्वी घेणे शक्य नाही : वर्षा गायकवाड

ऑनलाईन टीम / मुंबई : 


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील सहा – सात महिन्यांपासून राज्यातील शाळा, कॉलेज बंद आहेत. अनलॉक मध्ये काही प्रमाणात काही सेवा सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र, अजूनही शाळा बंदच आहेत. त्यामुळे विद्यार्थ्याच्या मनात होणाऱ्या परीक्षा, प्रवेश याबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. यातच शिक्षमंत्री वर्षा गायकवाड यांनी शुक्रवारी दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी दिली आहे.

Advertisements


त्या म्हणाल्या, 10 वी, 12 वीच्या परीक्षा मे पूर्वी घेणे शक्य नसल्याचे त्यांनी आज स्पष्ट केले. तसेच नववी ते बारावी पर्यंतच्या शाळा कॉलेज दिवाळी नंतरच सुरू करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला असल्याचे सांगितले. 


दहावी बारावीच्या परीक्षा मे महिन्यात घेण्याचा आमचा प्रयत्न राहील. मे नंतर परीक्षा घेतल्या तर त्याचा फटका ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना बसू शकतो. कारण जून ते ऑगस्ट पावसाळ्याचे दिवस असतील त्यानंतर सप्टेंबरमध्ये परीक्षा घेतल्या गेल्या तर पुढे रिझल्ट ला उशीर होईल आणि त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्षावर परिणाम होईल आणि असे आम्हाला होऊ द्यायचे नाही आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात 25 टक्के कपात करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यामुळे नोव्हेंबर मध्ये शाळा सुरू होणे गरजेचे असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.  

Related Stories

बारावीचा निकाल आज, ‘या’ संकेतस्थळावर पहा निकाल

Abhijeet Shinde

…मुंबईत अशी परिस्थिती उद्भवतेच कशी? : आशिष शेलार

Rohan_P

क्रिडाई कोल्हापूरचा स्वदेशीचा नारा!

Abhijeet Shinde

सांगली : हरिपूरमधील श्री संगमेश्वरची श्रावणी सोमवार यात्रा रद्द

Abhijeet Shinde

कोल्हापूर लगतच्या गावांत कोरोना संसर्गाचा धोका

Abhijeet Shinde

सातार्डे येथे महिला पोलीस पाटीलला मारहाण ; सहा जणांवर गुन्हा दाखल

Abhijeet Shinde
error: Content is protected !!