तरुण भारत

रिलायन्स रिटेलची हिस्सेदारी पीआयएफ घेणार

पीआयएफ 9,555 कोटी गुंतवणार  : रिटेलमध्ये गुंतवणुकीचा ओघ सुरूच

वृत्तसंस्था/ मुंबई

Advertisements

जगातील विविध कंपन्यांचा रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड, जिओ पाठोपाठ आता रिलायन्स रिटेलमध्ये गुंतवणुकीचा ओघ सुरु आहे. यामध्ये सध्या सौदीतील पब्लिक इन्वेस्टमेंट फंड(पीआयएफ) रिटेल प्लॅटफॉर्म 2.04 टक्क्यांची हिस्सेदारी खरेदी करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. सदरची हिस्सेदारी घेण्यासाठी पीआयएफ तब्बल 9,555 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.

रिलायन्स रिटेल वेंचर्स लिमिटेडमध्ये पीआयएफची गुंतवणूक 4.58 लाख कोटी रुपयांची प्री-मनी इक्विटी मूल्यावर आधारीत राहणार आहे. या गुंतवणुकीसह पीआयएफला भारताची रिटेल मार्केट सेगमेंटमधील स्थिती मजबूत करण्यात मोठी मदत होणार असल्याचे संकेत आहेत. या व्यवहारानंतर रिलायन्स रिटेलची 10.09  टक्के हिस्सेदारीचा व्यवहार होण्याची शक्यता आहे. यातून रिलायन्सला जवळपास 47,265 कोटी रुपयांच्या गुंतवणूकीचा आधार मिळणार आहे.

आतापर्यंतची रिटेलमधील गुंतवणूक

पीआयएफसह रिलायन्स रिटेलमध्ये आतापर्यंत 7 कंपन्यांनी गुंतवणूक केली आहे. यामध्ये सिल्वर लेक, केकेआर, जनरल अटलांटिक, मुबादला, जीआयसी, टीपीजी, एडीआयए सारख्या जागतिक गुंतवणूकदारांचा समावेश आहे.

Related Stories

अश्वनी भाटिया लवकरच एसबीआयच्या एमडीपदी

Patil_p

शेअर बाजार सलग दुसऱया दिवशी घसरणीत

Patil_p

‘ब्रिटानिया’वर डॉ. उर्जित पटेल यांची नियुक्ती

Amit Kulkarni

बाजारातील घसरणीचे सत्र कायम

Patil_p

गुंतवणूकदारांनी काढले विदेशी पोर्टफोलिओतून 474 कोटी

Patil_p

पेटीएम 2 हजार कोटी रुपये उभारणार

Patil_p
error: Content is protected !!