तरुण भारत

पुतिन राष्ट्राध्यक्षपद सोडण्याची शक्यता

ऑनलाईन टीम / मॉस्को : 

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन पार्किंसन्स आजाराने ग्रासले आहेत. त्यामुळे जानेवारीमध्ये ते राष्ट्राध्यक्षपद सोडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मॉस्कोचे राजकीय शास्त्रज्ञ वलेरी सोलोवी यांच्या हवाल्याने एका वृत्तसंस्थेने यासंदर्भात वृत्त दिले आहे. 

सोलोवी यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, पुतिन यांचे एक कुटुंब आहे, त्यांच्यावर त्यांचा खूप प्रभाव आहे. पुतिन यांची गर्लफ्रेंड अलिना कबाईला आणि दोन मुलींनीही त्यांना राष्ट्राध्यक्षपद सोडण्याचे आवाहन केले आहे. ते जानेवारीत राष्ट्राध्यक्षपद सोडू शकतात. पुतिन यांच्या सध्याच्या छायाचित्रांवरून त्यांच्यामध्ये आजाराची लक्षणे दिसून येतात. ते सध्या वेदनेने पीडित आहेत. 

दरम्यान, पुतिन यांनी काही दिवसांपूर्वी जिवंत असेपर्यंत कायदेशीर कारवाईपासून सूट मिळावी यासाठी विधेयक सादर केले होते. हे विधेयक सत्तेच्या हस्तांतराचे संकेत असल्याचे सांगण्यात येते. लवकरच नवीन राष्ट्राध्यक्ष नियुक्त करून त्यांना पुतिन यांच्या हाताखाली संरक्षित केले जाईल, असेही सोलोवी यांनी म्हटले आहे.

Related Stories

हनोई येथे सुरू झाले जगातील पहिले गोल्ड प्लेटेड हॉटेल

datta jadhav

जळगाव हादरले! एकाच घरातील चार मुलांची कुऱ्हाडीने घाव घालून हत्या

pradnya p

उत्तराखंडमध्ये कोरोना ग्रस्तांची संख्या 2800 वर

pradnya p

इस्रायलच्या मोसादला यश, इराणचा हल्ला हाणून पाडला

Patil_p

डॉ. हर्षवर्धन आज स्वीकारणार WHO च्या कार्यकारी मंडळाच्या अध्यक्षपदाची सूत्रे

datta jadhav

उत्तर प्रदेश : 50 जिल्ह्यात 29 जुलैला होणार बीएड परीक्षा; 28 ऑगस्टला निकाल

pradnya p
error: Content is protected !!