तरुण भारत

सांगली : मिरजेत नागरिकांनी रस्त्याचे काम बंद पाडले

प्रतिनिधी / मिरज

शहरातील गांधी चौक ते बॉम्बे बेकरी या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप करून नागरिक आणि मिरज शहर सुधार समितीच्या कार्यकर्त्यांनी सदरचे काम बंद पडले.

कामाची वर्क ऑर्डर नसताना तसेच टेंडरची मुदत संपली असताना हे काम सुरू होते. केवळ खडी आणि किरकोळ स्वरूपाचा डांबर ओतून रस्ता केला जात असल्याने नागरिकांनी कामास विरोध केला. केवळ नगरसेवकांच्या समाधानासाठी आणि अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून रस्त्याचे पॅचवर्क केले जात असल्याचे ठेकेदाराने सांगितले. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या रस्त्याचे काम उत्कृष्ट पद्धतीने करावे, अशी मागणी सुधार समितीने केली. महापालिका अधिकारी आणि नगरसेवकांनी रस्त्याचे काम चांगले करण्याची हमी दिल्यानंतर पुन्हा काम सुरू झाले.

Advertisements

Related Stories

सांगलीच्या प्राणीमित्राची वनविभागाकडून कसुन चौकशी

Abhijeet Shinde

पक्ष ठरवेल त्याच्या पाठीशी ठाम उभे राहा; चंद्रकांत पाटील यांची सूचना

Abhijeet Shinde

चुलत दिराकडून महिलेचा विनयभंग

Abhijeet Shinde

सांगली : मिरजेत अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू

Abhijeet Shinde

मराठा आंदोलनात सांगलीकरांचा सहभाग

Abhijeet Shinde

सांगली : कृष्णेत 50 हजार क्युसेक विसर्ग सुरु

Abhijeet Shinde
error: Content is protected !!