तरुण भारत

न्यूझीलंडमधील भारतीय वंशाच्या महिला मंत्र्यांनी केले मल्याळममध्ये भाषण

ऑनलाईन टीम / वेलिंग्टन : 

न्यूझीलंडच्या मंत्रीमंडळात समावेश झालेल्या भारतीय वंशाच्या प्रियांका राधाकृष्णन यांनी नुकतेच मल्याळममध्ये भाषण केले. आयएएस अधिकारी नितीन सांगवान यांनी या भाषणाचे ट्विट केले आहे. 

सांगवान यांनी या ट्विटमधील व्हिडिओला एक कॅप्शन दिले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, आपली भाषा, खाद्यसंस्कृती, राहणीमान ही आपल्यासाठी गर्वाची गोष्ट आहे. तसेच  आपल्या संस्कृती आणि सभ्यतेचे प्रतिक आहे.

41 वर्षीय प्रियांका या सर्वसमावेशकता व विविधता, वांशिक अल्पसंख्याक विभागाच्या त्या मंत्री झाल्या आहेत. घरगुती हिंसाचाराने ग्रस्त महिला, छळ झालेले स्थलांतरित कामगार यांच्या वतीने आवाज उठवला होता. त्यानंतर मजूर पक्षाच्या वतीने त्या 2017 मध्ये संसदेत निवडून आल्या होत्या. 2019 मध्ये त्यांची वांशिक समुदाय खात्याच्या मंत्र्यांच्या खासगी सचिवपदी नियुक्ती झाली होती.

Related Stories

इजिप्तमध्ये रोबोटिक टेस्टिंगची तयारी

Patil_p

अध्यक्ष क्वारंटाइनमध्ये

Patil_p

पाकमध्ये हिंदू महिलेचे विवाह मंडपातून अपहरण

Patil_p

इंडोनेशियात भूकंपाचे धक्के

datta jadhav

भारताशी मतभेद मिटविणार : चीनची नरमाईची भूमिका

Patil_p

पाकिस्तानच्या आरोग्यमंत्र्याना कोरोनाची बाधा

datta jadhav
error: Content is protected !!