तरुण भारत

रशिया-पाकिस्तानमध्ये होतोय पाचवा सैन्य अभ्यास

ऑनलाईन टीम / मॉस्को : 

रशिया आणि पाकिस्तानमध्ये पाचवा सैन्य अभ्यास होत आहे. यासाठी रशियाची तुकडी गुरुवारी पाकिस्तानात दाखल झाली आहे. 

Advertisements

रशिया आणि पाकिस्तानमध्ये दरवर्षी द्रजबा नावाने संयुक्त सैन्य अभ्यास आयोजित केला जातो. यंदाचा हा पाचवा सैन्य अभ्यास आहे. त्याला द्रजबा-5 असे नाव देण्यात आले आहे. दोन आठवडे चालणाऱ्या या सैन्य अभ्यासात स्काय ड्रायव्हिंग, दहशतवाद विरोधी आणि विशेष सैन्य ऑपरेशनचाही समावेश असेल. 

दहशतवादाला पोसणाऱ्या पाकिस्तानसोबत सैन्य अभ्यास करण्यास भारताने रशियाला विरोध केला होता. मात्र, रशियाने भारताचा विरोध झुगारून लावला आहे. गेल्या काही वर्षात रशियाने तालिबानसोबतही संपर्क वाढवला आहे. अफगाणिस्तानमध्ये नवी परिस्थिती निर्माण झाल्याने रशिया पाकिस्तानला महत्वाच्या भूमिकेत पाहात आहे.

Related Stories

इटलीत लॉकडाऊन

Patil_p

श्वानासोबत खेळताना बायडेन यांचा पाय फ्रॅक्चर

datta jadhav

कोलंबियात कोरोनाबाधितांची संख्या 7.77 लाखांवर

datta jadhav

पहिल्यांदाच लॅबमध्ये आईच्या दूधाची निर्मिती

Patil_p

चीन-भूतान यांच्यात करार

Amit Kulkarni

भारताला मिळणार 90 दशलक्ष डॉलर्सची उपकरणे

Patil_p
error: Content is protected !!