तरुण भारत

दिवाळीची सुट्टी वाढवली; विद्यार्थी आणि शिक्षकांना उद्यापासून 14 दिवसांची सुट्टी

ऑनलाईन टीम /  मुंबई : 


विद्यार्थी आणि शिक्षकांना आता ऑनलाईन शिक्षणातून 5 दिवसांवरून वाढ करत शालेय शिक्षण विभागाने ही सुट्टी 14 दिवसांची केली आहे. शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या या निर्णयाचे विद्यार्थी व पालक वर्गाने स्वागत केले आहे. 

Advertisements


त्यामुळे आता दिवाळीची सुट्टी उद्यापासून म्हणजेच 7 नोव्हेंबरपासून ते 20 नोव्हेंबरपर्यंत असणार आहे. 5 नोव्हेंबर 2020 मधील परीपत्रकानुसार 12 नोव्हेंबर ते 16 नोव्हेंबर अशी सुट्टी देण्यात आली होती यात आता बदल करून 14 दिवसाची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.


15 जूनपासून शाळा बंद असून सुद्धा ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. त्यासाठी विद्यार्थी, शिक्षक ऑनलाइन शिक्षण देऊन अभ्यासक्रम पूर्ण करत आहेत. त्यामध्ये अभ्यासक्रम वेळेत पूर्ण करता यावा, यासाठी यावर्षी सुट्या कमी देत असल्याचा आधी शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले होते. त्यामुळे दिवाळीच्या पाच दिवस सुट्या मिळत असल्याने शिक्षक संघटनांनी विरोध दर्शवत नाराजी व्यक्त्त केली. एकीकडे 15 जून पासून ऑनलाईन प्रशिक्षण घेऊन विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्याच काम शिक्षक अव्याहतपणे करत आहेत.

त्याशिवाय अनेकांनी कोविड ड्युटीमध्ये सुद्धा हातभार लावत विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिकवण्याचे काम केले. यामध्ये शिक्षकांना सुट्टी वाढवून देण्याची मागणी शिक्षक संघटनांनी केली होती. त्यानंतर आता 5 दिवसांऐवजी आता 14 दिवस शिक्षकांना दिवाळीची सुट्टी मिळणार आहे.

Related Stories

“हेलिकॉप्टर नाही तर जमिनीवरुन पाहणी करतोय,” मुख्यमंत्री ठाकरेंचा पंतप्रधान मोदींना टोला

Shankar_P

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर

triratna

सोलापूर : पोलीस उप निरीक्षक महादेव दरेकर यांचे निधन

Shankar_P

पालघर हत्याकांड : पीडितांची बाजू मांडणाऱ्या वकिलाचा अपघातात मृत्यू

pradnya p

कोनवडे ग्रामपंचायत उपसरपंच पदी सुभाष पाटील यांची निवड

triratna

मुंबईत पुन्हा एकदा लॉकडाऊन?; महापौरांनी दिले संकेत

pradnya p
error: Content is protected !!