तरुण भारत

बेळगाव जिह्यात शुक्रवारी 34 कोरोनाबाधित रूग्णांची नोंद

49 जण झाले बरे, गोकाक येथील वृध्दाचा मृत्यू

प्रतिनिधी / बेळगाव

Advertisements

गेल्या 15 दिवसांपासून कोरोना बाधितांची संख्या घटत चालली आहे. शुक्रवारी कोरोनामुक्त झालेल्या 49 जणांना घरी पाठविण्यात आले आहे. तर जिह्यातील 34 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. गोकाकमधील एका वृध्दाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. जिह्यात सध्या 498 जण सक्रिय रुग्ण आहेत.

बेळगाव शहर व उपनगरांतील 11, ग्रामीण भागातील 8 असे तालुक्यातील 19 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. जिह्यातील एकूण बाधितांची संख्या 24 हजार 890 वर पोहोचली असून मृतांचा सरकारी आकडा 335 झाला आहे. आतापर्यंत 24 हजार 57 जणांनी कोरोनावर मात केली आहे.

ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये उपचारासाठी एखाद्या इस्पितळात एक बेड मिळविणे कठीण होते. रोज 25 ते 50 जणांचा कोरोना व सारीमुळे मृत्यू होत होता. आता बेळगाव शहर व जिह्यात कोरोना पूर्णपणे आटोक्मयात आला आहे. अद्याप 2 हजार 123 जणांची स्वॅब तपासणी अहवाल यायचा आहे.

आतापर्यंत 2 लाख 32 हजार 388 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे. यापैकी 2 लाख 3 हजार 988 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. अद्याप 27 हजार 446 जण 14 दिवसांच्या होमकेअरमध्ये आहेत. शुक्रवारी बडस, मारिहाळ, आंबेवाडी, काकती, मुतगा, सोनोली, जाफरवाडी, होसूरमठ गल्ली, नानावाडी, नेहरुनगर, कणबर्गी, सदाशिवनगर, शाहूनगर, वैभवनगर, विनायकनगर परिसरात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.

Related Stories

शहरात भटक्मया कुत्र्यांचा उपद्रव

Patil_p

मोबाईल विक्रेत्यांचा आज देशव्यापी बंद

Patil_p

ज्ञान प्रबोधन शाळेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

Amit Kulkarni

राजधानीचा विमानप्रवास सुसाट

Amit Kulkarni

खाद्यतेलाच्या दरात 10 रुपयांनी घट

Amit Kulkarni

तालुक्यात पंधरा हजार रोपांची लागवड

Omkar B
error: Content is protected !!