तरुण भारत

निपाणी बीसीपीएसच्या उपनिरीक्षकपदी अनिता राठोड रुजू

प्रतिनिधी/ निपाणी

निपाणी बसवेश्वर पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षकपदी अनिता राठोड यांनी गुरुवारी एएसआय आर. जे. कुंभार यांच्याकडून पदभार स्वीकारला.

Advertisements

गेल्या तीन महिन्यांहून अधिककाळ निपाणी बसवेश्वर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक पद रिक्त होते. आता या पदासाठी अनिता राठोड यांची नियुक्ती झाली आहे. त्यामुळे समाधान व्यक्त होत आहे.

उपनिरीक्षक अनिता राठोड यांनी यापूर्वी प्रशिक्षित उपनिरीक्षक म्हणून निपाणी व चिकोडी येथे काम केले आहे. त्यामुळे त्यांना या अनुभवाचा येथे उपयोग होणार आहे. यावेळी अनिता राठोड यांचे एएसआय आर. जे. कुंभार यांनी बुके देऊन स्वागत केले. यावेळी हवालदार एस. एम. सनदी, ए. एन. रजपूत, आर. वाय. मेळगरे, एम. ए. तेरदाळ आदी कर्मचारी उपस्थित होते.

Related Stories

रेशनवरील ज्वारी वितरण निवडणुकीमुळे ठप्प

Amit Kulkarni

कागवाड शंभर टक्के बंद

Patil_p

बिम्समधील कर्मचाऱयांना पूर्ववत कामावर घ्या

Amit Kulkarni

वैभवनगर येथे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

Rohan_P

उचगाव साहित्य संमेलनातर्फे कवींना नावनोंदणीचे आवाहन

Amit Kulkarni

जायंट्स मेनने स्मशानभूमीमध्ये साजरी केली दिवाळी

Patil_p
error: Content is protected !!