तरुण भारत

ऊस वाहतूक करणाऱया वाहनांची रिफ्लेक्टर तपासणी

पोलीस उपनिरीक्षक आर. वाय. बिळगी यांची मोहीम : वाहनधारकांतून समाधान

वार्ताहर/ बोरगाव

Advertisements

गेल्या आठ दिवसांपासून सीमाभागातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम प्रारंभ झाला असून ऊस वाहतूक करण्यासाठी पहाटेपासून रस्त्यावर ट्रक्टर, ट्रक, बैलगाडय़ांची वर्दळ वाढली आहे. परिणामी रस्त्यावर वाहतुकीच्या वर्दळीमुळे  लहान-मोठे अपघात होऊ नयेत म्हणून बेळगाव जिल्हा पोलीस विभाग व सदलगा पोलीस स्थानकाचे पोलीस उपनिरीक्षक आर. वाय. बिळगी यांच्या नेतृत्वाखाली वाहनांची तपासणी व रिफ्लेक्टर बसविण्याची मोहीम शुक्रवारी बोरगाव येथे राबिवण्यात आली.

ऊस वाहतूक करणाऱया बैलगाडय़ांसह ट्रक्टर, ट्रक यांना वाहतुकीचे नियम पाळण्याबाबत कारखाना प्रशासनाकडून सूचना दिल्या असताना नियम धाब्यावर बसवून ऊस वाहतूकदार सर्रासपणे टॅक्टरवर मोठय़ाने गाणी लावून वाहन चालवितात. शिवाय फोनवरही बोलत असतात. विशेषकरून ऊस वाहतूक करणाऱया प्रत्येक वाहनांच्या पाठीमागे रिफ्लेक्टर बसविणे सक्तीचे असताना याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जात आहे. यामुळे अपघात होत होण्याची दाट शक्मयता असून यासाठी  सदलगा पोलीस स्थानकाच्यावतीने रस्त्यावरील ऊस वाहतूक वाहनांची तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. ऊस वाहतूकदारांनी नियमांचे उल्लंघन केल्यास सक्त कारवाई करण्याचा इशारा सदलगा पोलिसांकडून देण्यात आला आहे.

 सदलगा पोलीस उपनिरीक्षक आर. वाय. बिळगी यांनी राबविलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. सदलगा पोलीस साहाय्यक उपनिरीक्षक एस. एल. हुगार, एस. ए. गोडसे, व्ही. एस. हज्जी, एस. बी. जमादार, क्रांती खातेदार यांच्यासह अन्य पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

Related Stories

विकेंड कर्फ्यूला नागरिकांचा प्रतिसाद

Patil_p

पडलवाडी जंगलातील वाळू तस्करीची तहसीलदारांकडून पाहणी

Patil_p

टि.व्ही.सेंटर परिसरात पाऊण लाखांची घरफोडी

Patil_p

जिल्हय़ात 14 लाख मेट्रिक टन चारा साठा

Patil_p

वंटमुरी कॉलनी येथील महिलेला कोरोना

Patil_p

महिलेचे मंगळसूत्र पळविले

Patil_p
error: Content is protected !!