तरुण भारत

कोरोनावर प्रभावी उपचार : ऍस्पिरिन

ब्रिटनमध्ये होणार व्यापक प्रयोग आणि सर्वेक्षण, इतर अनेक उपायांपेक्षा हा स्वस्त उपाय

बाजारात अतिशय स्वस्त किमतीला मिळणारी ऍस्पिरिन ही गोळी कोरोनावर प्रभावी उपाय ठरू शकते, असे प्राथमिक प्रयोगांमध्ये दिसून आले आहे. आता ब्रिटनमध्ये यावर व्यापक संशोधन होणार असून त्यासाठी अनुमती देण्यात आली आहे. कोरोना रूग्णांमधील विशिष्ट रासायनिक क्रियेमुळे ऍस्पिरिनचा उपयोग प्रभावी ठरतो असे संशोधकांच्या लक्षात आल्याने हे प्रयोग होत आहेत.

Advertisements

कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या रूग्णाच्या रक्तामध्ये गुठळय़ा होण्याचे प्रमाण वाढते. याचे कारण असे की कोरोना विषाणूचा प्रतिकार पेशींकडून होत असताना रक्तातील प्लेटलेटस् वेगाने कार्यरत (हायपर ऍक्टिव्ह) होतात. त्यामुळे या प्लेटलेटस्चे पुंजके तयार होतात. या पुंजक्यांनाच रक्ताच्या गुठळय़ा असे म्हणतात. अशा गुठळय़ा होण्याचे प्रमाण वाढल्यास ते प्रकृतीला चांगले नसते.

ऍस्पिरिनमुळे रक्त पातळ

मात्र, रक्ताच्या गुठळय़ांवर ऍस्पिरिन हा प्रभावी उपाय आहे. ऍस्पिरिनच्या उपचारामुळे रक्त पातळ होते आणि त्यामुळे प्लेटलेटस्चे पुंजके विरघळले जातात. अशा प्रकारे सर्व शरिरात रक्तपुरवठा सुरळीत होऊन कोरोनाचा प्रभावी पद्धतीने प्रतिकार करता येतो, असे दिसून आले आहे. तसेच रक्ताच्या गुठळय़ा होण्याचे प्रमाण कमी झाल्याने शरिराला होणारे संभाव्य धोकेही टळतात, असे आढळले आहे.

2000 रूग्णांवर होणार प्रयोग

ब्रिटनमध्ये हे प्रयोग प्रथम 2000 कोरोना रूग्णांवर केले जाणार आहेत. या रूग्णांना 150 एमजी क्षमतेची ऍस्पिरिनची गोळी प्रतिदिन इतर औषधांसमवेत दिली जाणार आहे. काही दिवसांनंतर त्यांची तुलना ऍस्पिरिनची गोळी न दिलेल्या 2000 कोरोना रूग्णांशी केली जाणार आहे. ऍस्पिरिन दिलेल्या रूग्णांची आणि न दिलेल्या रूग्णांची प्रकृती कशी आहे याचा अभ्यास करून ऍस्पिरिनचा उपयोग कोरोनावर किती प्रमाणात होतो याचा अभ्यास केला जाणार असल्याचे सांगण्यात आले. या अभ्यासावर बऱयाच प्रयोगांचे भवितव्य ठरणार आहे, असे तज्ञांनी म्हटले आहे.

इतरही औषधांवर प्रयोग

ऍस्पिरिन प्रमाणेच ऍझिथ्रोमायसिन, तसेच रिजनरॉन्स अँटिबॉडी कॉकटेल या औषधांवरही प्रयोग सुरू आहेत. ही सर्वसामान्य अँटिबॉयोटिक्स आहेत. याच औषधांचा प्रयोग अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्यावरही, त्यांना कोरोना झाला होता तेव्हा, करण्यात आला होता. याबरोबरच भूतकाळात उपयोगात आलेल्या काही औषधांवरही नव्याने प्रयोग सुरू आहेत.

डॉक्टरांच्या अनुमतीनेच औषध घ्यावे

ऍस्पिरित असो किंवा अन्य कोणतेही औषध, ते कोरोनावर घ्यायचे असल्यास डॉक्टरांच्या अनुमतीनेच तसेच त्यांच्या प्रिस्क्रिप्शननुसारच घ्यावे, असे आवर्जून सांगण्यात आले आहे. तसेच या औषधांचे प्रमाण डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणेच असावे. स्वतःवर स्वतःच्याच माहितीनुसार औषधाचे प्रयोग केल्यास ते घातक ठरू शकतात, अशी स्पष्ट सूचना तज्ञांकडून करण्यात आली आहे. या सूचनेचे पालन सर्वांनी करावे, असे आवर्जून सांगण्यात आले आहे.

Related Stories

हास्यवायूने दूर होणार नैराश्य

Amit Kulkarni

चीनला किंमत फेडावी लागणार

Patil_p

लसीचे दुष्परिणाम झाल्यास ब्रिटन सरकार देणार नुकसान भरपाई

datta jadhav

भारत-चीन संघर्षात चीनचे 16 सैनिक ठार; चीनची कबुली

datta jadhav

चीनला मोठा झटका, रशियाने रोखला व्यवहार

Patil_p

अमेरिकेकडून भारताला 4.1 कोटी डॉलर्सची अतिरिक्त मदत

Patil_p
error: Content is protected !!