तरुण भारत

फटाके बंदीचा निर्णय समितीच्या अहवालावर आधारित : आरोग्यमंत्री

बेंगळूर/प्रतिनिधी

मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी आरोग्य विभागाच्या तांत्रिक सल्लागार समितीच्या सूचनेच्या आधारे या दीपावली दरम्यान फटाक्यांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी राज्यात फटाके बंदी असेल आणि लवकरच या संदर्भात आदेश जरी केले जातील असे शुक्रवारी म्हंटले होते. मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाचा दाखला देत आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी यावर्षी साध्या पद्धतीने दीपावली साजरी करण्याचे आवाहन केले आहे.

दरम्यान प्रसारमाध्यमांशी बोलताना मंत्रीसुधाकर यांनी फटाके जाळल्यानंतर होणाऱ्या धुरामुळे लोकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होईल, विशेषत: कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांच्या आरोग्यावर पुन्हा विपरीत परिणाम होण्याचा धोका आहे. याविषयी आरोग्य विभागाच्या तांत्रिक सल्लागार समितीने या संदर्भात अहवाल सादर केला होता. मुख्यमंत्र्यांनी अहवालाच्या आधारे हा निर्णय घेतला आहे. यावर्षी आम्ही साध्या पद्धतीने दीपावली साजरी करावी आणि अर्थपूर्ण मार्गाने अधिक दिवे लावून आपली परंपरा पुढे चालू ठेवावी, अशी विनंती त्यांनी यावेळी केली.

Advertisements

Related Stories

हत्तीच्या पिलाला पुनीत राजकुमार यांचे नाव

Sumit Tambekar

बेंगळूर: मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्या हस्ते ‘होमिओ भवन’ चे उद्घाटन

Abhijeet Shinde

कर्नाटक: राज्यातील १५० औद्योगिक प्रशिक्षण संस्था जागतिक दर्जाच्या होणार

Abhijeet Shinde

न्यायालयीन चौकशीबाबत भूमिका स्पष्ट करा

Amit Kulkarni

कर्नाटकला कोविशील्ड लसीचे २ लाख डोस मिळालेः आरोग्यमंत्री

Abhijeet Shinde

“कर्नाटकात उभारले जात आहेत १२७ ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प”

Abhijeet Shinde
error: Content is protected !!