तरुण भारत

केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांना कोरोनाची बाधा

ऑनलाईन टीम / तिरुवनंतपुरम : 


केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांना कोरोनाची लागण झाली आहे. याबाबतची माहिती राज्यपालांच्या ट्विटर अकाऊंटवरून देण्यात आली. 

Advertisements


केरळ राज्यभवनच्या मुख्य जनसंपर्क अधिकाऱ्यांने माहिती देताना सांगितले की, राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी सांगितले आहे की, माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. परंतु काळजी करण्यासारखे काही कारण नाही. तसेच मागील काही दिवसांपासून दिल्लीत माझ्या संपर्कात आलेल्या लोकांनी स्वतः ची कोरोना टेस्ट करून घ्यावी किंवा सुरक्षेच्या दृष्टीने आयसोलेट होण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले आहे. 


दरम्यान, शुक्रवारी केरळमध्ये 7002 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 7,854 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे कोरोना रुग्णांची एकूण संख्या 4 लाख 62 हजार 469 वर पोहचली आहे. तर 3,88,504 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 1,640 जणांनी आपला जीव गमावला आहे. 

Related Stories

बीपीएल कुटुंबातील व्यक्तीचा कोरोनाने मृत्यू झाल्यास 1 लाख

Patil_p

केंद्रिय कर्मचाऱ्यांना आता लोकलमधून प्रवास करण्यास परवानगी : आशिष शेलार

pradnya p

नोएडा : ओप्पो कंपनीतील सहा कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

pradnya p

जिओमध्ये अमेरिकन कंपनी ‘सिल्वर लेक’ची 5,656 कोटींची गुंतवणूक

pradnya p

रत्नागिरी जिल्ह्यात 4 नवे रुग्ण,बाधितांची संख्या 86 वर

triratna

वायू प्रदूषणाचा इतका धसका की…

Patil_p
error: Content is protected !!