तरुण भारत

ब्राझीलमध्ये 50 लाख रुग्ण कोरोनामुक्त

ऑनलाईन टीम / ब्रासिलिया : 

ब्राझीलमध्ये आतापर्यंत 56 लाख 32 हजार 505 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामधील 50 लाख 64 हजार 344 रुग्ण या आजारातून बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. वर्ल्डोमीटर या संकेतस्थळाने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. 

Advertisements

ब्राझीलमध्ये शुक्रवारी 18 हजार 247 नवे कोरोना रुग्ण आढळून आले. तर 256 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या ब्राझीलमध्ये 4 लाख 06 हजार 126 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यामधील 8 हजार 318 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. तर 1 लाख 62 हजार 035 जणांचा मृत्यू झाला आहे. 

कोरोना रुग्णवाढीच्या संख्येत ब्राझीलचा जगात तिसरा क्रमांक लागतो. ब्राझीलमध्ये आतापर्यंत 2 कोटी 19 लाख कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. कोरोना रुग्णवाढीच्या संख्येत अमेरिका पहिल्या तर भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. अमेरिकेत आतापर्यंत 1 कोटी  59 हजार 782 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर भारतात ही संख्या 84 लाख 62 हजार 080 एवढी आहे.

Related Stories

रसायनास्त्रांना नेहमीच विरोध असणार : भारत

Omkar B

सैन्यविमानांचा लस वितरणासाठी वापर

Patil_p

पंजशीर खोऱयाचे काय होणार ?

Patil_p

अमेरिकेच्या सीडीसीने पुन्हा बदलली मागदर्शक तत्वे

Omkar B

13 तासांची मोहीम, पाकिस्तानी टोळधाड पसार

Patil_p

वाघ-सिंहांसोबत खेळणारा श्रीमंत शेख

Amit Kulkarni
error: Content is protected !!