तरुण भारत

दिलासादायक : महाराष्ट्रात दिवसभरात 6,748 रुग्ण कोरोनामुक्त!

  • रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 91.53 %


ऑनलाईन टीम / मुंबई :


महाराष्ट्रात दिवसभरात 6 हजार 748 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आतापर्यंत 15 लाख 69 हजार 090 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सध्या 91.53 % आहे. 

  • ॲक्टिव्ह रुग्ण संख्या 1 लाखांपेक्षा कमी 


दरम्यान, मागील 24 तासात राज्यात 3, 959 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 17 लाख 14 हजार 273 वर पोहचली आहे. सध्या 99 हजार 151 रुग्ण उपचार घेत आहेत. दिवसभरात 150 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. तर मृतांचा एकूण आकडा 45 हजार 115 एवढा आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर 2.63 % आहे.


प्रयोगशाळेत आतापर्यंत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या 93 लाख 78 हजार 531 नमुन्यांपैकी 17 लाख 14 हजार 273 रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 10 लाख 63 हजार 163 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून, 9 हजार 799 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

Related Stories

आता खरी परीक्षा, रूग्ण संख्या रोखूया

Patil_p

ब्राझीलमधून येणाऱ्या प्रवाशांवर अमेरिकेने घातली बंदी

datta jadhav

चाक थांबले… प्रशासन धावले…

Patil_p

विधानसभा अधिवेशनापूर्वी ‘या’ राज्यातील 23 आमदार कोरोना पॉझिटिव्ह

pradnya p

जनतेला कर्मयोगी सरकार हवयं, बोलघेवडे नाही : फडणवीस

Shankar_P

यशवंतराव चव्हाण यांचा वारसा चालविणार

Patil_p
error: Content is protected !!