तरुण भारत

हारुगेरी नगराध्यक्षपदी निर्मला कुरी

उपनगराध्यक्षपदी कविता सरीकर : दोन्ही निवडी बिनविरोध

वार्ताहर/ कुडची

Advertisements

हारुगेरी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदी निर्मला प्रकाश कुरी व उपनगराध्यक्षपदी कविता रामचंद्र सरिकर यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक अधिकारी म्हणून तहसीलदार चंद्रकांत बजंत्री यांनी काम पाहिले. निवडीनंतर समर्थकांनी गुलालाची उधळन करत जल्लोष केला.

  हारुगेरी नगरपरिषदेवर काँग्रेसचे वर्चस्व आहे. नगराध्यक्ष पदासाठी सामान्य तर उपनगराध्यक्ष पदासाठी एससी महिला आरक्षण आले होते. त्यामुळे या पदांवर कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. शुक्रवारी नगराध्यक्ष-उपनगराध्यक्ष निवड प्रक्रियेला प्रारंभ झाला. दोन्ही पदांसाठी एकमेव अर्ज आल्याने तहसीलदार चंद्रकांत बजंत्री यांनी निवडी बिनविरोध घोषित केल्या. यावेळी पालिका मुख्याधिकारी जी. बी. अरण्यकेरी यांची प्रमुख उपस्थिती होती. निवड होताच कार्यकर्ते व समर्थकांनी जल्लोष केला. नूतन पदाधिकाऱयांनी नेतेमंडळींच्या सहकार्याने शहराच्या विकासासाठी प्रयत्नशील राहण्याचे आश्वासन दिले. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस उपनिरीक्षक यमनाप्पा मांग यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

  यावेळी महेंद्र तम्मण्णावर, भीमू बदनीकाई, ब्रह्मदेव आलूर, बी. बी. मुगडीहाळ, अशोक आसकी, राजू कुरी, परशराम धर्मट्टी, राजू कोटलगी यांच्यासह मान्यवर, नगरसेवक व समर्थक उपस्थित होते.

Related Stories

…अन् अंगाला चिकटताहेत लोखंडी वस्तू

Amit Kulkarni

जितोतर्फे चार ठिकाणी पाणपोईंची सोय

Amit Kulkarni

बेळगुंदी-पिरनवाडी परिसरात संचारबंदीची कडक अंमलबजावणी

Patil_p

सार्वजनिक गणेशोत्सवासाठी परवानगी द्या

Patil_p

संत-महंतांच्या अभंगवाणीतून भारतीय संस्कृतीची जोपासना

Amit Kulkarni

हंगामी कामगार ‘एल ऍण्ड टी’च्या दारात

Amit Kulkarni
error: Content is protected !!