तरुण भारत

रियल माद्रीदचे दोन फुटबॉलपटू कोरोना बाधित

वृत्तसंस्था/ माद्रीद

रियल माद्रीद फुटबॉल क्लबचे दोन फुटबॉलपटू कोरोना चांचणीमध्ये पॉझिटिव्ह असल्याची माहिती या क्लबच्या वरिष्ठ अधिकाऱयांनी दिली. रियल माद्रीद संघातील कॅस्xमिरो आणि एडन हॅझार्ड या दोन फुटबॉलपटूंना कोरोनाची बाधा झाली आहे. ला लीगा फुटबॉल स्पर्धेत रियल माद्रीदचा पुढील सामना व्हॅलेन्सिया बरोबर होणार आहे.

Advertisements

कॅसेमिरो आणि हॅझार्ड यांची शुक्रवारी सकाळी कोरोना चांचणी घेण्यात आली.s या चांचणीमध्ये त्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे आढळून आले. गेल्या आठवडय़ात रियल माद्रीद संघातील बचावफळीत खेळणारा इडेर मिलीटो यालाही कोरोनाची बाधा झाल्याचे आढळून आले होते. ला लीगा स्पर्धेत गेल्या मंगळवारी झालेल्या सामन्यात रियल माद्रीदने इंटर मिलानचा 3-2 अशा गोलफरकाने पराभव केला. या स्पर्धेच्या गुणतक्त्यात रियल सोसीयादाद पहिल्या स्थानावर असून रियल माद्रीद दुसऱया स्थानावर आहे.

Related Stories

बीसीसीआयतर्फे लेव्हल-2 प्रशिक्षण शिबीर

Patil_p

बांगलादेशची पहिल्या डावात घसरगुंडी

Patil_p

माजी हॉकी प्रशिक्षक परमेश्वन यांचा ‘द्रोणाचार्य’साठी अर्ज

Patil_p

ऍथेन्स मॅरेथॉन रद्द

Patil_p

आशिया चषक क्रिकेट स्पर्धा लांबणीवर पडण्याची शक्यता

Patil_p

ऑस्ट्रेलियन फलंदाज ट्रव्हिस हेडला कोरोना

Patil_p
error: Content is protected !!