तरुण भारत

संजय मांजरेकर यांचा समालोचन पथकात समावेश

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भारताचा माजी क्रिकेटपटू आणि क्रिकेट समालोचक संजय मांजरेकर यांचे टीव्ही चॅनेलवर क्रिकेट समालोचन क्षेत्रात पुनरागमन होणार आहे. भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱयावर जाणार असून या दौऱयावेळी संजय मांजरेकर पुन्हा क्रिकेट समालोचन करणार आहेत.

Advertisements

ऑस्ट्रेलियाच्या दौऱयात कसोटी, वनडे आणि टी-20 मालिका खेळविल्या जाणार आहेत. या मालिका 27 नोव्हेंबर ते 19 जानेवारी दरम्यान होणार आहेत. सोनी पिक्चर्स नेटवर्कतर्फे या मालिकेतील सामन्यांचे भारतामध्ये प्रक्षेपण करण्यात येणार आहे. 55 वर्षीय संजय मांजरेकर यांची समालोचनसाठी निवड करण्यात आली आहे. 2020 च्या आयपीएल स्पर्धेच्या समालोचन पॅनेलमधून भारतीय क्रिकेट मंडळाने संजय मांजरेकर यांना वगळले होते. भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱयाला वनडे मालिकेने प्रारंभ होणार आहे. तीन सामन्यांची वनडे मालिका 27 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर दरम्यान होणार असून त्यानंतर तीन सामन्यांची टी-20 मालिका 4 ते 8 डिसेंबर दरम्यान खेळविली जाणार आहे.

Related Stories

संजीतला सुवर्णपदक, अमित, थापा यांना रौप्यपदक

Amit Kulkarni

शासनाच्या निर्णयाची बीसीसीआयकडून प्रतीक्षा

Patil_p

धमाकेदार विजयासह भारतासाठी सराव सामन्यांची सांगता

Patil_p

आयपीएल स्पर्धेची रुपरेषा आज निश्चित होण्याची शक्यता

Patil_p

आयपीएल कार्यकारिणीची आज महत्त्वाची बैठक

Patil_p

सात महिन्यानंतर मोहन बगानला मिळाला करंडक

Patil_p
error: Content is protected !!