तरुण भारत

कोरोना विषाणूला नाकातच रोखणार नेजल स्प्रे

प्रतिदिन स्पे करणे लसीप्रमाणेच उपयुक्त ठरणार : बाधितासोबतही राहता येणार

कोलंबिया विद्यापीठाच्या वैज्ञानिकांनी एक असा नेजल स्प्रे विकसित केला आहे, जो कोरोना विषाणूला नाक आणि फुफ्फुसांमध्येच रोखणार आहे. हा स्प्रे महागडा नाही तसेच याच्यासाठी फ्रीजरचीही गरज भासणार नाही. केवळ नाकात स्प्रे करावा लागणार आहे. हा स्प्रे शरीरात कोरानाला पुढे जाऊ देणार नाही.

Advertisements

वैज्ञानिकांनी स्प्रेचा फेरेट्सवर (मुंगूसासारखा प्राणी) याची चाचणी केली आहे. हा प्राणी कोरोना विषाणूपासून सुरक्षित राहिला आहे. याचे आता मानवी परीक्षण करण्यात येणार आहे. प्रतिदिन स्पे केल्यास लसीप्रमाणेच काम होणार आहे. कुठल्याही बाधितासोबत राहत असतानाही विषाणूपासून सुरक्षित राहता येणार आहे.

अध्ययनाच्या सह-लेखिका मायक्रोबायोलॉजिस्ट डॉ. एन. मोस्कोना यांच्यानुसार स्पे विषाणूवर थेट हल्ला करतो. यात एक लिपोपेप्टाईड असतो. हा कोलेस्टेरॉलचा हिस्सा असतो, जो प्रोटीनचे मूलभुत अंग एमिनो ऍसिड्सच्या श्रृंखलेशी जोडलेला असतो. हा लिपोपेप्टाइड विषाणूच्या स्पाइक प्रोटीनमधील एमिनो ऍसिड्ससमानच असतो.

कोरोना विषाणू याच्याचद्वारे फुफ्फुसांच्या पेशी किंवा श्वासनलिकेवर हल्ला करतो. तेथे स्पाइक खुलतात आणि आरएनए पेशींमध्ये घुसण्याचा प्रयत्न करतात. त्याचा सामना एमिनो ऍसिड्च्या दोन श्रृंखलांशी होतो. स्पाइक बंद होताच स्पेमधील लिपोपेप्टाईड देखील यात प्रवेश करतात आणि विषाणूला पुढे जाण्यापासून रोखतात.

संशोधनाचे लेखक आणि कोलंबिया विद्यापीठातील मायक्रोबायोलॉजिस्ट मॅटिया पेरोट्टो यांनी झिप लावताना मध्ये आणखीन एक झिपर लावल्यास झिप लागत नाही, तसाच हा प्रकार असल्याचे म्हटले आहे. लिपोप्रोटीनला पांढऱया पावडरप्रमाणे तयार केले जाऊ शकते, ज्याला कुठल्याही फ्रीजमध्ये ठेवण्याची गरज भासत नाही. कुठलाही डॉक्टर किंवा फार्मासिस्ट पावडरला साखर आणि पाण्यासोबत मिळून नेजल स्प्रे तयार करू शकतो. अन्य प्रयोगशाळांनीही अँटीबॉडीज किंवा मिनी प्रोटीन्स विकसित केले असून ते विषाणूला रोखतात, परंतु रासायनिक स्वरुपात ते अधिक जटिल असतात आणि त्यांना थंड तापमानात ठेवण्याची गरज भासते, असे डॉ. मोस्कोना यांनी म्हटले आहे.

24 तास बचाव

अध्ययनादरम्यान 6 फेरेट्सना स्प्रे देण्यात आला आणि दोन-दोन फेरेट्सना तीन पिंजऱयांमध्ये ठेवण्यात आले आहे. प्रत्येक पिंजऱयात एक फेरेट कृत्रिम स्पे देऊन आणि एक फेरेटला कोरोनासंक्रमित करण्यात आले. 24 तासांनंतर स्प्रे देण्यात आलेला फेरेट सुरक्षित असल्याचे दिसून आले आहे. तर कृत्रिम स्प्रे घेणारे फेरेट संक्रमित झाले आहेत. स्पे नाक आणि फुफ्फुसांच्या पेशींशी जोडला जातो आणि 24 तासांपर्यंत प्रभावी राहत असल्याचे मोस्कोना यांनी म्हटले आहे.

गरोदर महिला अन् मुलांमध्ये इन्फ्लुएंजाचा धोका अधिक

जागतिक आरोग्य संघटनेने मुले आणि गरोदर महिलांसाठी इशारा दिला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या तांत्रिक प्रमुख मारिया वेन यांच्यानुसार आगामी हिवाळय़ात एन्फ्लुएंजाचा कोणता प्रभाव पडणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. अशा स्थितीत महामारीदरम्यान याची देखरेख आणि चाचणी करणे अत्यंत आवश्यक आहे.

इन्फ्लुएंजा म्हणजेच फ्ल्यूच्या अतिजोखीम शेणीत येणाऱया लोकांनी लस टोचून घेण्याची गरज आहे. कारण कोरोनाच्या महामारीत याची व्याप्ती कमी होत नाही. क्लीनिकल मॅनेजमेंट प्रमुख जेनेट डियाज यांच्यानुसार कोरोना आणि इन्फ्लुएंजा यांची लक्षणे समान आहेत, यातील फरक खूपच कमी आहे. अशा स्थितीत सामायिक लक्षणे दिसल्यास उपचारापूर्वी चाचणी अवश्य करून घ्यावी. हिवाळय़ात महामारीदरम्यान एन्फ्लुएंजाचा प्रभाव किती राहणार हे सांगणे अवघड असल्याने लक्षणांकडे दुर्लक्ष करण्यात येऊ नये.

Related Stories

जगभरात मागील 24 तासात 4.90 लाख नवे कोरोना रुग्ण

datta jadhav

फ्रान्समध्ये धार्मिक कट्टरवादावर कठोर प्रहार

Patil_p

वुहानच्या प्रयोगशाळेतून फैलावला नाही कोरोना!

Patil_p

50 टक्के सौंदर्यप्रसाधने धोक्याची, घातक रसायनांचा वापर

Patil_p

चीनला किंमत फेडावी लागणार

Patil_p

धोका कायम : ब्रिटनमध्ये जानेवारी नंतर पहिल्यांदाच कोरोनाचे 42,302 नवे रुग्ण

Rohan_P
error: Content is protected !!