तरुण भारत

गुपचूप तुरुंगाबाहेर आला होता राम रहिम

गुन्हेगाराला हरियाणा सरकारकडून एक दिवसाचा पॅरोल

वृत्तसंस्था/ पंचकूला

Advertisements

बलात्कार तसेच हत्येप्रकरणी 20 वर्षांची शिक्षा भोगत असलेला डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहिम एक दिवसांच्या पॅरोलवर बाहेर आला होता. राम रहिमला 24 ऑक्टोबर रोजी स्वतःच्या आजारी आईला भेटण्यासाठी पॅरोल देण्यात आला होता. सरकार आणि तुरुंग प्रशासनाने प्रसारमाध्यमांना याचा सुगावा लागू दिला नव्हता. पॅरोलंनतर राम रहिम गुरुग्रामच्या एका रुग्णालयात उपचार घेत असलेल्या स्वतःच्या आईला भेटला होता. त्यादरम्यान सुनारिया तुरुंगापासून गुरुग्रामच्या रुग्णालयापर्यंत चिलखती वाहनांमधून त्याला नेण्यात आले आणि परत आणले गेले आहे. समर्थकांना जमण्यापासून रोखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले.

राम रहिम 25 ऑगस्ट 2017 पासून रोहतकच्या तुरुंगात कैद आहे. साध्वींवर बलात्कार आणि पत्रकार रामचंद्र छत्रपती यांच्या हत्येप्रकरणी राम रहिमला दोषी ठरविण्यात आले होते. नियमांनुसारच पॅरोल देण्यात आल्याचा  दावा मंत्री रणजीत सिंग चौताला यांनी म्हटले आहे. परंतु राम रहिमचे यापूर्वीच पॅरोलचे अर्ज फेटाळण्यात आले होते.

सुरक्षेत तीन तुकडय़ा

राम रहिम 24 ऑक्टोबर रोजी संध्याकाळपर्यंत स्वतःच्या आजारी आईसोबत होता. हरियाणा पोलिसांच्या तीन तुकडय़ा तेथे तैनात करण्यात आल्या होत्या. एका तुकडीत 80 ते 100 जवान होते. राम रहिम येण्यापूर्वी रुग्णालयातील एक मजला पूर्णपणे रिकामा करविण्यात आला होता.

Related Stories

बिहारमध्ये दिवसभरात 668 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

pradnya p

लादेनचा खात्मा करणारे शूर आयटीबीपीमध्ये

Patil_p

काश्मिरी पंडितांच्या हुसकावणीला 30 वर्षे पूर्ण

Patil_p

उत्तराखंडच्या राज्यपाल बेबी रानी मौर्य कोरोना पॉझिटिव्ह

pradnya p

कोरोनाचा उद्रेक : देशात गेल्या 24 तासात 45,720 नवे रुग्ण; एकूण संख्या 12 लाख पार

pradnya p

50 वर्षांवरील नागरिकांना मार्चपासून लसीकरण

Patil_p
error: Content is protected !!