तरुण भारत

मडगाव पालिका क्षेत्रात पाच वर्षांत विविध विकासकामे मार्गी

सत्तेवर राहिलेल्या गोवा फॉरवर्डच्या नगरसेवकांकडून दावा

प्रतिनिधी/ मडगाव

Advertisements

मडगाव पालिकेत सत्ता राहिलेल्या गोवा फॉरवर्डच्या नगरसेवकांनी शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मागील पाच वर्षांत विविध विकासकामे मार्गी लावल्याचा दावा केला. पक्षाच्या फातोर्डा येथील कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत 4 वर्षे कारभार सांभाळलेल्या माजी नगराध्यक्षा डॉ. बबिता प्रभुदेसाई तसेच जवळपास वर्षभर कारभार पाहिलेल्या माजी नगराध्यक्षा पूजा नाईक काणेकर यांनी आपआपल्या कारकिर्दीत झालेल्या विकासकामांचा व अन्य महत्त्वाच्या कामांचा लेखाजोखा यावेळी मांडला.

यात फातोर्डात रवींद्र भवनसमोरील जनमत कौल चौक, फातोर्डातील जंक्शनजवळील वाहतूक सिग्नल्स, एसजीपीडीएसमोरील रस्त्यावर स्थित कपेल विरुद्ध दिशेने स्थलांतरित करण्याचे काम यांचा समावेश असल्याचे तसेच काही बसथांबे वुई फॉर फातोर्डाच्या मदतीने उभारण्यात आल्याचे नजरेस आणून देण्यात आले.

सोनसडा कचरा प्रकल्प तसेच बहुमजली पार्किंग प्रकल्प पाच वर्षे का रेंगाळला यासंदर्भात माजी नगराध्यक्षा डॉ. प्रभुदेसाई समाधानकारक उत्तर देऊ शकल्या नाहीत. फोमेन्तोकडून सोनसडय़ाचा ताबा मिळविण्यासाठी न्यायालयात दाद मागणे भाग पडले. त्यामुळे काही अंशी फटका बसला. बहुमजली पार्किंग प्रकल्पासाठी निविदांना आधी बोली मिळाली नाही. नवीन जीएसआरनुसार निविदा काढण्यासाठी सध्या आवश्यक कृती करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. पालिका इमारतीची रंगरंगोटी करणे पालिकेला 5 वर्षांत शक्मय झाले नाही याकडे लक्ष वेधले असता प्रभुदेसाई यांनी वारसा इमारत असल्याने काही तांत्रिक अडचणींमुळे ते शक्मय न झाल्याचे सांगून सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.

कचरा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न

सोनसडा येथील कचऱयाचे ढीग कमी करण्यासाठी बायोरेमेडिएशन प्रक्रिया सुरू करून 40 टक्के कचऱयावर प्रक्रिया करण्यात आली आहे. पावसाळय़ात हे काम बंद ठेवण्यात आले होते. ते पुन्हा सुरू करण्यात येईल. कचरा प्रकल्प शेडमध्ये हजारो टन कचरा फोमेन्तोच्या काळापासून पडून होता. तो हटविण्यात आल्याची माहिती काणेकर यांनी दिली. नुकताच कचऱयावर प्रक्रियेसाठी 7 बायोमिथेनेशन प्रकल्प घनकचरा व्यवस्थापन महामंडळाच्या सहकार्याने उभारण्यासाठी ठराव घेण्यात आला आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

पालिका मंडळाला विविध कारणास्तव मागील 5 वर्षांत बहुमजली पार्किंग प्रकल्प उभारणे शक्मय झाले नाही. चार वेळा निविदांना प्रतिसाद मिळाला नाही. आता या प्रकल्पाचा अंदाजित खर्च वाढून 8 कोटी रुपयांवर पोहचला आहे. मुक्तीदिनाच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त मिळालेले 3 कोटी व व्याज मिळून 5 कोटी झाले असून अतिरिक्त 3 कोटी 14 व्या अथवा ?15 व्या वित्त आयोगाच्या निधीतून वापरण्याची परवागनी सरकारकडून घेण्यासाठी पत्रव्यवहार करण्याचा ठराव पालिकेच्या शेवटच्या बैठकीत घेण्यात आला आहे, याकडे काणेकर यांनी लक्ष वेधले.

Related Stories

मुंबई-गोवा महामार्गाला 2022 ची डेडलाईन

Patil_p

कर्णबधिरांच्या इंटरप्रेटरचा प्रश्न सुटेना

Patil_p

कुडचडे नगरपालिकेत नाटय़पूर्ण घडामोडी

Amit Kulkarni

सरकारी कर्जांची रक्कम जाते कुठे?

Patil_p

झुआरीनगरातील कंटेनमेंट झोनभोवती पोलीस सुरक्षा अधिक कडक करणार

Patil_p

वास्कोतील दामोदर भजनी सप्ताह उद्यापासून, मात्र देवदर्शनाला बंदी

Omkar B
error: Content is protected !!