तरुण भारत

राज्यातील भाजपचे सरकार दिशाहीन

प्रतिनिधी/ पणजी

राज्यातील भाजप सरकारची अवस्था मुंडके नसलेल्या कोंबडीसारखी झाली असून कुठलीही दिशा नसताना ते कुठेही इकडे तिकडे धावत सुटले आहे. आधी सनबर्न महोत्सवाला मान्यता देण्यात आली आणि आता ते रद्द करण्यात आले आहे याच्यावरून सरकार दरबारी किती गोंधळ सुरू आहे हे दिसून येते, असा आरोप आम आदमी पक्षाचे नेते सुरेल तिळवे यांनी पत्रकार परीषदेत शनिवारी केला.

  भाजप सरकार लोकांशी कुठल्याही विषयावर चर्चा, वार्तालाप किंवा विचार विनिमय करायला तयार नाही ज्यामुळे आता त्यांना शेवटच्या मोक्मयाच्या क्षणी सनबर्न महोत्सव रद्द करणे भाग पडले आहे. हे तर स्पष्टच दिसते आहे की मुख्यमंत्र्यांचा आपल्या इतर मंत्र्यांवर काहीही ताबा राहिलेला नाही, सनबर्न संदर्भात आरोग्य मंत्र्यांशीही चर्चा करण्यात आली नाही जेव्हा महामारीचे संकट अजूनही कमी झाले नाही अशी परीस्थिती आहे असेही तिळवे यांनी यावेळे सांगितले.

  यावेळी होऊ शकणारे सनबर्न कोविड विषाणूचा बॉम्ब विस्फोट ठरू शकला असता कारण या महोत्सवाला शेकडो वा हजारोंच्या संख्येने लोक हजेरी लावणार होते. तसेच दरवषी सरकार स्वतःचे डावपेच खेळते आणि महोत्सवाला देण्यात येणारी परवानगी शेवटच्या क्षणापर्यंत अधांतरी लटकून ठेवते कारण त्यांना त्यातून मिळणाऱया कमिशनचा वाटा जास्त वाढवायचा असतो. असे तिळवे यांनी पुढे सांगितले.

  एरव्हा हे सरकार स्थानिक लोकांशी वा जनतेशी कुठल्याही विषयावर चर्चा न करता काहीही करीत सुटले आहे मग रेल्वे मार्गांचे डबल टेकिंग असो, महामार्ग रुंदीकरण असो आणि औद्योगिक प्रकल्पांसाठी आरक्षित जंगले नष्ट करणे असो, हे सर्व लोकांच्या विरुद्ध असलेले प्रकल्प सरकार प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न करीत आहे. मुळात सरकारने सनबर्न महोत्सव जनतेच्या दबावामुळे रद्द केला आहे. त्यामुळे सरकारने गोव्याच्या जनतेशी यापुढे कुठल्याही विषयावर चर्चा व सल्ला मसलत करूनच निर्णय घेतला गेला पाहिजे, असे सुरेल तिळवे शेवटी म्हणाले.

Related Stories

शिरदोन किनाऱ्यावर अर्भकाचा मृतदेह सापडल्याने खळबळ

Patil_p

कर्नाटकातील नागरिकांची गावी जाण्यासाठी रिघ चालूच

Omkar B

‘कोविड’च्या संकटात ‘दिल की आवाज सून’…

Patil_p

सासष्टीत धिरयोच्या आयोजनामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न

Patil_p

मिळेल तिथे प्रवेश घ्या, अन्यथा वर्ष वाया जाईल!

Patil_p

साळगावकरांनी कचरा प्रकल्प विस्तारीकरणाविरोधातील पत्र दाखवावे

Patil_p
error: Content is protected !!