तरुण भारत

जगभरातील कोरोनाबाधितांची संख्या 5 कोटींवर

ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन : 

जगभरात आतापर्यंत 5 कोटी 02 लाख 78 हजार 660 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 12 लाख 56 हजार 558 जणांचा मृत्यू झाला आहे. वर्ल्डोमीटर या संकेतस्थळाने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. 

Advertisements

शनिवारी जगभरात 5 लाख 98 हजार 160 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. तर 7446 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण 5.02 लाख बाधितांपैकी 3 कोटी 55 लाख 56 हजार 538 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. अजूनही 1 कोटी 34 लाख 65 हजार 564 ॲक्टिव्ह केसेस असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यामधील 91 हजार 801 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. 

कोरोना रुग्णवाढीचा वेग अमेरिकेत सर्वाधिक आहे. अमेरिकेत आतापर्यंत 1 कोटी 01 लाख 82 हजार 977 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामधील 64 लाख 41 हजार 748 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 2 लाख 43 हजार 257 जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेनंतर कोरोना रुग्णवाढीच्या संख्येत भारताचा दुसरा क्रमांक लागतो. भारतात आतापर्यंत 85 लाख 07 हजार 754 जणांना कोरोनाची बाधा झाली असून, 78 लाख 68 हजार 968 रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. तर 1 लाख 26 हजार 162 जणांचा मृत्यू झाला आहे. 

Related Stories

हिटमॅन रोहित शर्माला सर्वोत्तम एकदिवसीय क्रिकेटपटूचा पुरस्कार जाहीर

prashant_c

प्रियांका राधाकृष्णन ठरल्या न्यूझीलंडमधील भारतीय वंशाच्या पहिल्या मंत्री

datta jadhav

फ्रान्समध्ये वाहतूक कोंडी

Patil_p

पाकिस्तानात दोन पॅसेंजर ट्रेन्सची धडक; 30 ठार

datta jadhav

पाकच्या पंतप्रधानांची फजिती

Amit Kulkarni

सीएए, एनआरसी कायदा हे भारताचे अंतर्गत प्रश्न

Patil_p
error: Content is protected !!