तरुण भारत

सातारा : गुळुंबच्या दोन युवकांची वेगवेगळ्या ठिकाणी आत्महत्या

प्रतिनिधी / सातारा

वाई तालुक्यातील गुळुंब येथील आज चवणेश्वराची यात्रा होती. यात्रेच्या आदल्या दिवशी एका युवकाने मुंबईत आत्महत्या केली. तर त्याच्याच मित्राने वेळे गावच्या हद्दीत आज आत्महत्या केल्याची घटना घडली. या घटनेची नोंद भुईंज पोलीस ठाण्यात झाली असून गावात शोककळा पसरली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की वाई तालुक्यातील गुळुंब गावातील सूरज ज्ञानेश्वर भोजणे हा युवक व्यवसाय व कामानिमित्त मुंबई येथे असतात. त्यांनी ही राहत्या प्लॅटमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. त्यांचा विवाह नुकताच ठरला होता. स्वतःचा ट्रान्सपोर्ट व्यवसाय होता. सहा ट्रक होते. मात्र, आत्महत्या केल्याचे कारण समजू शकले नाही. आज गुळुंबमध्ये देवाची काठी निघणार होती. तत्पूर्वी भोजणे याच्या निधनाचे वृत्त गावात समजले अन् कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यात्रा अगोदरच साधी करण्यात येणार होती.

Advertisements

सूरज भोजणे याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तोच दुपारी गावातील निलेश बंडू भिलारे ( वय30 ) याने वेळे गावच्या शुक्रराज पवार यांच्या शेतात झाडाला वायरने गळफास लावून घेतल्याची घटना घडली.त्याच्याही आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. मात्र, त्याने दारूच्या नशेत आत्महत्या केल्याची नोंद भुईंज पोलीस ठाण्यात त्याचा भाऊ राहुल भिलारे यांनी केली आहे. भुईंज पोलिस ठाण्याचे पोलीस नाईक अतुल आवळे हे तपास करत आहेत. निलेश याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दोघे ही एकमेकांचे चांगले मित्र होते. त्यांच्या निधनाने गावावर शोककळा पसरली आहे.

Related Stories

पुढील ५ दिवस ४ राज्ये आणि १ केंद्रशासित प्रदेशात पावसाचा हाय अलर्ट

Abhijeet Shinde

नितीन गडकरींच्या पुढाकारामुळे महाराष्ट्राला दररोज ९७ मेट्रिक टन लिक्विड ऑक्सिजन मिळणार

Abhijeet Shinde

सातारा : कांद्यावरची निर्यात बंदी हटाव – काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव

Abhijeet Shinde

राज ठाकरेंच्या ‘त्या’ विधानाला रोहित पवारांचे प्रत्युत्तर

Rohan_P

नागपूरमध्ये 15 ते 21 मार्च संपूर्ण लॉकडाऊन

Rohan_P

आरोग्य विभागाचे कारभारी बदलणार

Patil_p
error: Content is protected !!