तरुण भारत

क्वीन्स गार्डन विकासाकडे कॅन्टोन्मेंटचे दुर्लक्ष

विकासाकरिता निधी नसल्याने दुर्दशा : विकास करण्याची नागरिकांची मागणी

प्रतिनिधी/  बेळगाव

Advertisements

कॅन्टोन्मेट परिसराच्या विकासाबरोबर उद्यानाच्या सुशोभिकरणाचा प्रयत्न कॅन्टोन्मेंट बोर्डने केला होता. तसेच उद्यानाच्या विकासाकरिता लाखोच्या निधीची तरतूद केली होती. मात्र उद्यानांचा विकास साधण्यात कॅन्टोन्मेंट बोर्डला अपयश आले आहे. कॅम्प परिसरात ब्रिटिशकालीन असलेल्या क्वीन्स गार्डनची दुरवस्था झाली आहे. लहान मुलांच्या खेळाच्या साधनाऐवजी संपूर्ण उद्यान गवत, झाडे-झुडपांनी व्यापले असल्याने उद्यान नष्ट झाले आहे.

कॅन्टोन्मेंट व्याप्तीमध्ये अनेक खुल्या जागा आहेत. यापैकी काही जागा उद्यानासाठी राखीव आहेत. तसेच काही जागा क्रीडांगणासाठी राखीव आहेत. पण राखीवतेनुसार जागांचा वापर केला जात नाही. कारण कॅन्टोन्मेंटच्यावतीने उद्यानाच्या विकासाकरिता निधीची तरतूद केली होती. मात्र निधीचा वापर करून कोणत्या उद्यानाचा विकास केला, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सध्या कॅन्टोन्मेंटमधील काही मोजकी उद्याने वगळता अन्य उद्यानांची दुरवस्था झाली आहे. उद्यानामध्ये गवत आणि झाडे-झुडपे वाढली असून सुशोभिकरणाऐवजी विद्रुपिकरण झाले आहे.

शर्कत पार्कच्या मागील बाजूस ब्रिटिश काळात क्वीन्स गार्डन निर्माण करण्यात आली होती. सदर उद्यानात विविध प्रकारची झाडे असल्याने खूपच सुंदर आणि निसर्गरम्य होते. पण सध्या विकासाकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने उद्यानाची दुरवस्था झाली आहे. सदर उद्यान शांत असल्याने याठिकाणी अभ्यासाकरिता मुलांची गर्दी होत असे. तसेच विविध शाळांच्या सहली आयोजित करण्यात येत होत्या. मात्र याठिकाणी असलेले साहित्य खराब झाले असल्याने उद्यानाला अवकळा प्राप्त झाली आहे. प्रशस्त जागेत असल्याने ब्रिटिशकाळात निर्माण करण्यात आल्याने उद्यानात नेहमी गर्दी होत असे. पण सध्या देखभालीअभावी गवत, झाडे-झुडपे वाढल्याने उद्यानाची दुर्दशा झाली आहे.

निधी नसल्याने विकासाचे काम रखडले

उद्यानाचा विकास करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. खेळाचे साहित्य तसेच बसण्यासाठी खुर्च्या बसविण्यात येणार होत्या. तसेच लॉन घालण्याचा आणि पिण्याच्या पाण्याची टाकी बसविण्याचा प्रस्ताव होता. पण निधी नसल्याने आणि सदर जागा लष्कराची असल्याचा दावा करण्यात आल्याने विकास करण्याचे रखडले आहे. गवत व झुडपांमुळे पहाटे आणि सायंकाळी फिरावयास येणाऱया नागरिकांना फिरण्यास मोठी अडचण निर्माण झाली आहे. दुर्लक्षित असलेल्या आणि निसर्गरम्य असलेल्या क्वीन्स गार्डनच्या सुशोभिकरणाचे काम तातडीने हाती घ्यावे, अशी मागणीही होत आहे.

Related Stories

चोऱ्यांच्या सत्राने मारुतीनगर वासीय भयभीत

Rohan_P

प्रत्येकाने क्रीडास्पर्धांमध्ये सहभागी होणे आवश्यक

Amit Kulkarni

आज गणरायाला देण्यात येणार निरोप

Patil_p

नंदगड बाजाराच्या प्रवेशद्वारावरच कचरा-घाणीचे साम्राज्य

Amit Kulkarni

तिसऱया दिवशीही बससेवा ठप्प

Amit Kulkarni

उचगावमध्ये दिवसाढवळय़ा धाडसी चोरी

Amit Kulkarni
error: Content is protected !!