तरुण भारत

शिरोळ तालुक्यात २००५ पासून क्षारपड जमीनीचा सर्वेच नाही

प्रतिनिधी / शिरोळ

शिरोळ तालुक्यात कृषी खात्यामार्फत २००५ पासून क्षारपड जमीनीचा सर्वे केला नसल्याने गेल्या पंधरा वर्षात किती जमीन क्षारपड जमीन बनली आहे. याचा अधिकृत आकडा नसला तरी किमान २५ हजार हेक्टरच्यावर जमीन क्षारपड बनली असल्याची शक्यता आहे.

Advertisements

शिरोळ तालुका हा सुजलाम सुफलाम म्हणून ओळखला जात होता. गेल्या पंचवीस-तीस वर्षांमध्ये अति पाण्याचा व भरमसाठ रासायनिक खते कीडनाशके याबरोबरच नैसर्गिक पाण्याचा निचरा होणारे मार्ग बंद केल्यामुळे क्षारपड जमीन बनलेल्या आहेत. क्षारपड जमीन धारक शेतकऱ्यांना कोणतीही अर्थसंस्था साहाय्य करण्यास असमर्थता दर्शवली होती. यामुळे या शेतकऱ्यांना आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक बनली आहे.

श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांनी तीन वर्षांपूर्वी क्षारपड जमीन सुधारण्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्णय घेतला. प्रारंभिक क्षारपड जमीन धारक शेतकऱ्यांची बैठक घेऊन त्यांचे मतपरिवर्तन केले प्रति एकरी एक लाख रुपये खर्च अपेक्षित धरण्यात आला. ही रक्कम भरण्यास बहुसंख्य क्षारपड जमीन धारक शेतकऱ्यांनी असमर्थता दर्शविली होती. गणपतराव पाटील यांनी आप्पासाहेब सा.रे. पाटील सहकारी बँकेच्या माध्यमातून अर्थसहाय्य करण्याचा धाडसी निर्णय यासाठी 50 कोटी रुपयांचा तरतुद केली. त्यांच्या निर्णयावर अनेक अर्थतज्ञांनी चिंता व्यक्त केली होती.

तालुक्यातील शेडशाळ आलास गणेश वाडी बुबनाळ गंगावती अर्जुनवाड घालवाड कवठेसार यासह अन्य गावांमध्ये सहकारी संस्था स्थापन करून क्षारपड जमीन सुधारणा याच्या कामास सुरुवात केली. आज अकराशे एकर जमिनीमध्ये गहू, हरभरा, शाळू, भाजीपाला, ऊसासह अन्य पीक जोमाने आले आहेत. शेतकऱ्यांनी तीन कोटी 50 लाख रुपयांचे कर्जही फेडले आहे. कारखान्याचे मुख्य शेती अधिकारी श्रीशैल हे गाना यांनी वेळोवेळी या कामे सहकार्य केले आहे. अत्याधुनिक यंत्रसामग्रीचा वापर करण्यात आला आहे. सध्या शिरोळ हेरवाड शिरढोण गावातील जमीन मुक्तीचा कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे.

एकशे तीन किलोमीटर इतकी मुख्य पाईपलाईन टाकण्यात आली असून पाच हजार एकर जमीन क्षारपड मक्त करण्यात येणार आहे. क्षारपड जमीन सुधारण्यासाठी शासनाने अर्थ सहाय्य करण्याची तयारी दर्शवली आहे. सध्या मुंबईहून दिल्लीला फाईल पाठवण्यात आली आहे. त्वरित शासनाने अनुदान देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

राज्याचे मुख्य कृषी सचिव एकनाथ डवले यांनी रविवारी पाहणी करून समाधान व्यक्त केले आहे गणपतराव पाटील यांनी लागू देत असलेला हा प्रकल्प राजभर होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले हा पॅटर्न राज्यभर लागू झाला तर तालुक्यात आणखी एक मानाचा तुरा रो ला जाणार आहे. शिरोळ तालुका कृषी अधिकारी गणेश भोसले यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की 2005 सालीच्या सर्वेनुसार 20 हजार हेक्टर जमीन क्षारपड बनली आहे. जल आयोगाकडून प्रतिवर्षी सर्वे केला जातो त्याची माहिती मिळु शकली नसेलयाचे त्यांनी सांगितले

Related Stories

सीपीआरमध्ये बालकावर दुर्बिणीद्वारे हृदय शस्त्रक्रिया

triratna

पुणे मिरज लोंढा रेल्वे दुहेरीकरण, विद्युतीकरणगतीने

triratna

केकतवाडी गावास 35 लाख 80 हजार पेयजल योजनेतून मंजूर

triratna

शेतकर्‍यांच्या प्रश्नावर समरजीत घाटगे यांचे दसरा चौकात उपोषण

Shankar_P

कोरोना कालावधीतील वीज देयक हप्त्यात भरण्याची सवलत

Shankar_P

सवडीने घेतलेल्या निर्णयामुळे जिल्ह्यात कोरोनाची स्थिती गंभीर

triratna
error: Content is protected !!