तरुण भारत

काँग्रेसच्या ट्रक्टर रॅलीवेळी डिचोलीत तणाव

डिचोली/प्रतिनिधी

   केंद्र सरकारने संमत केलेल्या घातक कृषी बिलांच्या विरोधात शेतकऱयांना समर्थन देण्यासाठी काँग्रेस पक्षातर्फे डिचोली शहरातून आयोजित करण्यात आलेल्या टेक्टर रेलीला शासकीय परवानगी नसल्याचे कारण पुढे करीत पोलिसांनी सदर रेली डिचोली जुन्या बसस्थानकावर अडविण्याचा प्रयत्न केला यावेळी काँग्रेस नेते आणि पोलीस अधिकारी यांच्यामध्ये बरीच शाब्दकि चकमक झाली. बराच वेळ या विषयावर तु तू मै मै झाल्यानंतर पोलीस उपअधीक्षक व संयुक्त मामलेदार यांनी हस्तक्षेप केला. रेलीला परवानगी नसल्याने रेलीच्या स्वरूपात न जाता विस्कळीतपणे जाण्याचा सल्ला काँग्रेस नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना देण्यात आला. दरम्यान या प्रकाराचा काँग्रेस पक्षातर्फे जाहीर निषेध करण्यात आला.

Advertisements

   शेतकऱयांना समर्थन दर्शविण्यासाठी काँग्रेस पक्षातर्फे डिचोली ते म्हापसा अशी टेक्टर रेलीचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी आवश्यक असलेल्या शासकीय परवानगीसाठी आठ दिवसांपूर्वीच संबंधित शासकीय कार्यालयांमध्ये अर्ज करण्यात आले होते. मात्र भाजप सरकारतर्फे हेतुपुरस्सरपणे या अर्जांना प्रलंबित ठेऊन शेवटपर्यंत परवानगी न देण्याचे राजकारण खेळण्यात आले. सदर अर्ज मंजूर झाला आहे, अथवा फेटाळण्यात आला आहे. याचेही साधे उत्तर न आल्याने सदर अर्जाला मंजुरी ग्राह्य धरून काँग्रेस पक्षातर्फे या रेलीची तयारी करण्यात आली होती. असे डिचोली गट काँग्रेस अध्यक्ष मेघश्याम राऊत यांनी सांगितले.

  सदर रेली हि लोकशाही मार्गाने शांततेत करण्यात येणार होती. या रेलीचा लोकांना आणि वाहनचालांना त्रास होऊ नये याची खबरदारी घेण्यात येणार होती. त्यासाठी केवळ दोन तीनच टेक्टर आणण्यात आले होते. मात्र या भाजप सरकारकडून लोकशाहीच्या तत्वा?ची कशाप्रकारे पायमल्ली केली जाते आणि विरोधांचा कशा प्रकारे आवाज दडपून ठेवला जातो, याचे ज्वलंत उदाहरण त्यांनी आज दाखवून दिले. असे मेघश्याम राऊत यांनी म्हटले.

सरकार आणि मुख्यमंत्र्यांच्या मनात काँग्रेसच्या आंदोलनाची भिती का ?

  काँग्रेस सरकार सत्तेवर असताना भाजप पक्षाने राज्यात कितीतरी मोठमोठय़ा विषयांवर आंदोलने केली. त्या आंदोलनांन काँग्रेस सरकारने पोलीस बळाचा वापर करून दडपण्याचा कधीच प्रयत्न केला नाही. लोकशाही मार्गाने आंदोलने करण्याचा अधिकार हा सर्वच पक्षांना आहे. सरकारविरोधात असलेला आवाज सरकारपर्यंत पोहोचविण्याचा हक्क आम्हाला आहे. मात्र सरकार आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आज या टेक्टर रेलीला का घाबरले कि त्यांना 200 पोलीस पाठवून हि रेली बंद पाडण्यासाठी दबाव आणला. आमचे आंदोलन हे लोकशाही मार्गाने असून ते आम्ही याहीपुढे चालूच ठेवणार, असे यावेळी काँग्रेस पक्षाध्यक्ष गिरीष चोडणकर यांनी म्हटले.

या रेलीपेक्षा धमकी देणाऱयाच्या मागावर पोलीस पाठवले असते तर संशयित सापडला असता.

  मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा या सरकारवरील ताबा सुटला आहे. प्रशासन चालविण्यात ते फोल ठरले आहेत. त्यांच्या सरकारकडून होणाऱया प्रत्येक निर्णयाला आज जनता विरोध करू लागली आहे. यावरून हे सरकार लोकांच्या नजरेतून उतरू लागले आहे. याचा अंदाज सरकारला आणि मुख्यमंत्र्यांना मिळू लागला आहे. म्हणूनच त्यांनी सत्तेचा गैरवापर करताना आमचे आंदोलन दडपण्यासाठी पोलिसांचावापर केला आहे. आज हे आंदोलन दडपण्यासाठी आणलेल्या पोलिसांना जर मुख्यमंत्र्यांना धमकी देणाऱयाला शोधण्यासाठी पाठवले असते तर तो संशयीत मिळू शकला असता, असा टोला विजय भिके यांनी मारला.

   या सरकारने आज सर्व क्षेत्रात लोकांची परिस्थिती बिकट करून ठेवली आहे. या देशाचा कणा असलेल्या शेतकऱयांच्या मिळकतीवरही या सरकारने आता आपला डोळा ठेवला आहे. याच शेतकऱयांना समर्थन देण्यासाठी आम्ही काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आज डिचोलीत जमले होते. मात्र या सत्तेवरील भ्रष्ट भाजप सरकारने टेक्टर रेलीला परवानगी नाकारत आज पोलिसांकरवी हे शांततेच्या मार्गाने  हाती घेतलेले आंदोलन दडपण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. त्याचा आम्ही निषेध करीत असल्याचे प्रवीण ब्लेगन यांनी म्हटले.

पोलीस आणि काँग्रेस पक्षाच्या नेत्यांमध्ये शाब्दकि चकमक.

  हि रेली काल रविवारी आयोजित करण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. तसेच सदर रेलीला परवानगी नसल्याचेही पोलिसांना माहित असल्याने डिचोली पोलीस उपअधिक्षक गुरूदास गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली डिचोली पोलीस निरिक्षक महेश गडेकर व वाळपई पोलीस निरीक्षक सागर एकोसकर यांच्या नेतृत्वाखाली मोठय़ा संख्येने पोलीस फाटा तैनात करण्यात आला होता. सदर रेली सुरू करण्याच्या हेतूने काँग्रेस कार्यकर्ते पक्षाध्यक्ष गिरीष चोडणकर यांच्या नेतृत्वाखाली डिचोली जुन्या बसस्थानकावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळय़ाजवळ जमले. यावेळी त्यांनी टेक्टरही बरोबर आणले होते. ते रेलीला प्रारंभ करणार इतक्मयात पोलिसांनी सदर रेली अडविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलीस आणि काँग्रेस नेते यांच्यात बरीच शाब्दकि चकमक झाली. त्यामुळे काही काळ या परिसरातील वातावरण तणावाचे बनले. मात्र नंतर संयुक्त मामलेदार श्रीपाद माजिक यांनी आंदोलनकर्त्यांची समजूत घालताना रेलीला रितसर परवानगी नसल्याने या जागेवरून रेली स्वरूपात न जाता विस्कळीतपणे जाण्यास सांगितले. आंदोलन शांतता मार्गाने करीत असल्यास सदर बाब शांतपणे ऐकण्याची त्यांनी विनंती केल्यानंतर काँग्रेस नेत्यांनी मोठी रेली न काढता काही अंतर एकत्रित पदक्रमण केले आणि नंतर म्हापसाच्या दिशेने कुच केली.

Related Stories

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विहिंपचा श्रीरामनाम जप

Amit Kulkarni

विद्यालयांच्या प्रारंभाबाबत अनिश्चितता

Patil_p

‘त्या’ दोन्ही मंत्र्यांना डच्चू द्यावा

Omkar B

सरकारने स्वताची फजिती करून घेऊ नये : गिरीश चोडणकर

Amit Kulkarni

आंचिमच्या ‘कंट्री फोकस’मध्ये बांगलादेश

Patil_p

मुरगाव तालुक्याला जायकाचे पाणी पुरवण्याचे सा.बां.खा. मंत्र्यांचे आश्वासन

Patil_p
error: Content is protected !!