तरुण भारत

अरुणाचल सीमेजवळच्या रेल्वेमार्गाचे काम सुरूच ठेवा : जिनपिंग

ऑनलाईन टीम / बीजिंग : 

अरुणाचल प्रदेशच्या सीमेजवळून जाणाऱ्या तिबेटच्या लिंझी प्रांतातील रेल्वेमार्गाचे काम पूर्ववत सुरू ठेवण्याचे आदेश चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी दिले आहेत.

Advertisements

सिचुआन ते तिबेट या मार्गावर चीनचा रेल्वेप्रकल्प उभारला जात आहे. हा चीनचा दुसरा सर्वात मोठा रेल्वे प्रकल्प आहे. या प्रकल्पाचे काम मध्यंतरी थांबवण्यात आले होते. रविवारी जिनपिंग यांनी या रेल्वेमार्गाचे काम पूर्ववत करण्याचे आदेश बांधकाम विभागाला दिले आहेत. या प्रकल्पावर चीन 47.8 दशलक्ष डॉलर खर्च करणार असून, या प्रकल्पावरून भारत-चीन तणावात वाढ होण्याची शक्यता आहे. 

सिचुआन ते तिबेट या रेल्वे मार्गामुळे चीनच्या कोणत्याही भागातून थेट अरूणाचलच्या सीमेवर रेल्वेने सामग्री पोचवण्याचे काम चीनला सोपे होणार आहे. यापूर्वी चीनने किंगहाई-तिबेट हा रेल्वे प्रकल्प सुरू केला आहे. 

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच चीनने अरुणाचल प्रदेशवर आपला दावा सांगितला होता. भारताने हा दावा फेटाळून लावला होता. मात्र, त्यानंतरही चीनने अरुणाचल प्रदेशच्या भागात रेल्वे प्रकल्प उभारण्यास सुरुवात केली. लिझीं प्रांतात चीनने एक विमानतळही उभारले आहे. चीनच्या या हालचाली भारतासाठी धोकादायक ठरू शकतात

Related Stories

‘एससीओ’ची ऑनलाईन शिखर परिषद 10 नोव्हेंबरला

datta jadhav

पेहरावातून समर्थन

Patil_p

ट्रम्प डेथ क्लॉक

Patil_p

बिडेन अन् ट्रम्प यांच्यात अटीतटीची लढत

Patil_p

आभास झा यांच्यावर वर्ल्ड बँकेने सोपवली मोठी जबाबदारी; वाचा सविस्तर…

datta jadhav

‘टिकटॉक’चा ओरॅकलसोबतचा करार पूर्ण

datta jadhav
error: Content is protected !!