तरुण भारत

कोल्हापूर जिल्ह्यात 67 नवे रूग्ण, 78 कोरोनामुक्त

कोल्हापूर जिल्ह्यात 715 सक्रीय रूग्णांवर उपचार सुरू

प्रतिनिधी / कोल्हापूर

Advertisements

कोरोनाची साथ नियंत्रणात आली असली तरी गेल्या चार दिवसांच्या तुलनेत सोमवारी नव्या रूग्णांत वाढ झाली आहे. पण ती कोरोनामुक्तांच्या संख्येत कमी आहे. जिल्ह्यात सोमवारी कोरोनाने एकाचा मृत्यू झाला. दिवसभरात 78 जण कोरोनामुक्त झाले. तर कोरोनाचे 67 नवे रूग्ण दिसून आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनील माळी यांनी दिली.

जिल्ह्यात सोमवारी कोरोनाने खासगी हॉस्पिटलमध्ये कागल तालुक्यातील चिखली येथील 65 वर्षीय पुरूषाचा मृत्यू झाला. आजपर्यत कोरोनाने 1 हजार 657 जणांचा मृत्यू झाला. ग्रामीण भागात 818, नगरपालिका क्षेत्रात 338, कोल्हापूर शहरात 360 तर अन्य जिल्ह्यांतील 141 जणांचा समावेश आहे. दिवसभरात 78 जण कोरोनामुक्त झाल्याने कोरोनामुक्तांची संख्या 46 हजार 179 झाली. तसेच 67 नवे रूग्ण दिसून आल्याने पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 48 हजार 551 झाली आहे.

सध्या 715 रूग्ण उपचार घेत आहेत. शेंडा पार्क येथील लॅबमधून सोमवारी 786 जणांचे रिपोर्ट आले. त्यापैकी 727 निगेटिव्ह आहेत. ऍटिजेंन टेस्टचे 78 रिपोर्ट आले. त्यापैकी 77 निगेटिव्ह आहेत. गेल्या 24 तासांत आजरा 3, भुदरगड 0, चंदगड 5, गडहिंग्लज 10, गगनबावडा 0, हातकणंगले 3, कागल 6, करवीर 7, पन्हाळा 0, राधानगरी 0, शाहूवाडी 4, शिरोळ 1, नगरपालिका क्षेत्रात 1, कोल्हापूर शहर 23, अन्य 4 असे 67 रूग्ण असल्याची माहिती डॉ. माळी यांनी दिली.

पॉझिटिव्ह रूग्ण 67, कोरोनामुक्त 78, कोरोना मृत्यू 1
आजपर्यतचे कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण ः 48 हजार 551
आजपर्यतचे कोरोनामुक्त रूग्ण ः 46 हजार 179
सध्या उपचार घेत असलेले कोरोना रूग्ण ः 715
आजपर्यतचे एकूण कोरोना बळी ः 1 हजार 657
गेल्या 24 तासांत 241 संशयित रूग्ण तपासणी

Related Stories

मोटरसायकल घसरून अपघात; महिला जागीच ठार

Abhijeet Shinde

जीवनधारा ब्लड बँक व उमेद फाउंडेशनच्यावतीने अनुस्कुरा परिसरातील गरजू मुलांना सायकल वाटप

Abhijeet Shinde

रेल्वे स्टेशनवर आंदोलक-पोलिसांत झटापट

Abhijeet Shinde

वारणा साखर कारखान्याचे जेष्ठ संचालक गोविंदराव जाधव यांचे निधन

Abhijeet Shinde

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी चुरशीने मतदान

Sumit Tambekar

सिद्धगिरी कणेरी मठावरील गुरुपौर्णिमा यंदा ऑनलाईन

Abhijeet Shinde
error: Content is protected !!