तरुण भारत

दुर्गमभागाच्या विकासासाठी लोकमान्य प्रयत्नशील

बेळगाव प्रतिनिधी

 ग्रामीण भागाचा विकास व्हावा, यासाठी शासनाच्या विविध योजना असल्या तरी अनेक प्रश्न गावात असतातच. त्याची सोडवणूक जलदगतीने कशी होईल, याचा विचार करून लोकमान्य सोसायटी ‘गाव दत्तक योजना’ राबवित आहे. दुर्गम भागातील कुटुंबस्तरावर हा उपक्रम राबविला जात आहे.

Advertisements

 दुर्गम गावांतील युवकांना रोजगारासाठी इतरत्र भटकावे लागते. त्यामुळे  गाव दत्तक योजनेच्या माध्यमातून गावातील नागरिकांना रोजगार उपलब्ध करून देऊन त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी लोकमान्य सोसायटीच्या सहकार्याने लोकमान्यचे संस्थापक अध्यक्ष किरण ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली हे कार्य सुरू आहे.

   लोकमान्य ग्राम दत्तक योजना हा प्रकल्प गेल्या 2012 सालापासून चालू आहे. या प्रकल्पात खानापूर तालुक्मयातील पश्चिम भागातील दुर्गम खेडी दत्तक घेतली आहेत. यामध्ये 32 खेडय़ांचा समावेश आहे. दुर्गम भागातील लोकांना रोजगार मिळावा व त्यांच्या दैनंदिन गरजा पूर्ण व्हाव्यात. जेणेकरून ते सुद्धा चांगल्या प्रकारे आपले जीवन व्यतीत करू शकतील, हा या मागचा मूळ उद्देश आहे. यामुळे लोकमान्य सोसायटीचे कर्मचारी त्या भागात जाऊन गावांचा सर्व्हे करून प्रत्येक सदस्याची माहिती घेऊन, कुटुंब प्रमुखाचा व्यवसाय किंवा गरीब निर्मूलन रेषेखाली असलेल्या कुटुंबांची माहिती गोळा करून त्यांना रोजगार उपलब्ध करून देत आहेत. या प्रकल्पानुसार दुर्गम भागातील गरीब कुटुंबांतील सदस्यांकडून दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर आकाशकंदील बनवून घेतले जात आहेत. या सर्वांना रोजगार मिळावा यासाठी लोकमान्य सोसायटीचा खूप मोठा वाटा आहे. 

    खानापूरच्या दुर्गम भागात मोठय़ा प्रमाणात थंडी, पाऊस असतो.  याशिवाय रस्तेही खचलेले असतात. त्यामुळे येथील काही गावांचा,  नागरिकांचा या काळात संपर्क तुटतो. अशा दुर्गम भागात काम करताना अनेक समस्या येतात. पण गेल्या 8 ते 9 वर्षांपूर्वी या दुर्गम भागातील गावांमध्ये मध संकलन केंद्र स्थापन करून येथील एका गावाला 70 पेटय़ा मध दिलेले आहे. यामुळे प्रत्येक पेटीपासून दहा बाटल्या मध मध मिळत आहे. त्यामुळे त्यांना हे एक उत्पन्नाचे माध्यम निर्माण झाले आहे. हा उपक्रम प्रत्येक गावात राबविण्याच्या अनुषंगाने लोकमान्य सोसायटीच्यावतीने सर्व्हे करण्यात येत आहे. दिवाळीच्या दरम्यान आकाशकंदील बनवून घेऊन बेळगाव शहरात त्याची विक्री करून दुर्गम गावांतील कुटुंबांना व्यवसाय मिळवून देण्याचे काम लोकमान्य सोसायटी करत आहे. ही संख्या वाढविण्याचा उद्देश आहे.

लोकमान्यच्यावतीने अनेक उपक्रम सुरूकिरण गावडे  

दुर्गम भागातील नागरिकांना कोणताही उद्योगधंदा उपलब्ध नाही. त्यांच्याकडे मुख्यतः शेती करण्यात येते. पण शेती व्यवसाय अनिश्चित आहे. कारण जंगल भाग असल्याने शेती केल्यानंतर जंगली जनावरे पिकांचा फडशा पाडतात. त्यामुळे येथील नागरिकांना आपल्या शेतीचे संरक्षण करता येत नाही. त्यामुळे काही शेतकऱयांनी शेती सोडून दिली आहे. त्यांच्याकडे उत्पन्नाचे साधन नाही. त्यामुळे या भागातील नागरिकांना उत्पन्नाचे साधन उपलब्ध करून देण्यासाठी लोकमान्यच्यावतीने अनेक उपक्रम राबविण्यात येत आहेत.

 लोकमान्यमुळेच आमची दिवाळी साजरी होतेमहेश मारुती नाईक

गेल्या अनेक वर्षांपासून माझे वडील दिवाळीनिमित्त आकाशकंदील बनविण्याचे काम करतात. एक कंदील बनविण्यासाठी साधारण सहा ते सात तासांचा कालावधी लागतो. किरण ठाकुर यांच्यामुळे आम्ही दरवषी दिवाळी साजरी करू शकतो. कारण त्यांच्याच प्रेरणेने आम्ही दरवषी आकाशकंदील बनवून लोकमान्य सोसायटीच्या साहाय्याने विक्री करतो. त्यामुळे आम्हाला रोजगार उपलब्ध होत असल्याचे हुळंद गावातील महेश याने सांगितले.

लोकमान्यमुळेच आमच्या गरजाही भागतात–  मारुती गोपाळ नाईक

 दुर्गम भागात येण्या-जाण्यासाठी वाहतूक नसल्यामुळे मुलांना दुसऱया जागी  कामानिमित्त पाठविणे शक्मय नाही. त्यामुळे घरीच मुलांच्या मदतीने आकाशकंदील बनवून लोकमान्य सोसायटीमार्फत विक्री करत आहोत. यातून आमची दिवाळी साजरी होते. या शिवाय आमच्या गरजाही भागतात. तसेच वैयक्तिक पातळीवर होलसेल दराने आकाशकंदील विक्री करायचे म्हटले तर या भागात वाहतूक, रस्ते व्यवस्थित नाहीत. परंतु लोकमान्यच्या माध्यमातून आम्हाला गेल्या 10 वर्षांपासून आकाशकंदीलची विक्री करणे सोपे जात आहे.

आकाशकंदील सर्वसामान्यांना परवडतील अशा दरात उपलब्ध राजू नाईक

लोकमान्य सेवा केंद्रातून, गाव दत्तक योजनेतून लोकमान्य हा उपक्रम राबवत आहे. दुर्गम भागातील लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या हेतूने लोकमान्य सोसायटी कार्यरत आहे. यावषी आकाशकंदील सर्वसामान्यांना परवडतील अशा दरात उपलब्ध करून दिले आहेत. त्यामुळे दुर्गम भागातील नागरिकांना हे उत्पन्नाचे साधन मिळाले आहे.

Related Stories

हृदयशस्त्रक्रियेसाठी मदतीचे आवाहन

Amit Kulkarni

एपीएमसी बाजारात कांदा दरात वाढ

Omkar B

मुहूर्त साधण्याची लगबग

Patil_p

कोगनोळी नाक्याला पोलीस छावणीचे स्वरुप

Amit Kulkarni

अलतगा येथे शाळा दोन सत्रात भरविण्याचा निर्णय

Patil_p

मॅन्युअल स्कॅव्हेंजरअंतर्गत स्वच्छता कामगारांना प्रशिक्षण

Amit Kulkarni
error: Content is protected !!