तरुण भारत

मध्यप्रदेशात अपघातात कुटुंबातील 7 जणांचा मृत्यू

डंपर-बोलेरोची समोरासमोर धडक, 5 जण गंभीर जखमी

सतना / वृत्तसंस्था

Advertisements

मध्यप्रदेशातील सतना जिह्यात सोमवारी सकाळी डंपर आणि बोलेरो कारची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला असून 5 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती जिह्याचे अतिरिक्त पोलीस निरीक्षक सुरेंद्र कुमार जैन यांनी दिली. सर्व मृत रिवा येथील रहिवासी आहेत. मृतांमध्ये 3 महिला आणि एका लहान मुलाचा समावेश आहे. सर्व मृत एकाच कुटुंबातील असल्याची माहितीही पोलीस सूत्रांनी दिली. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी या दुर्घटनेबाबत शोक व्यक्त केला आहे.

पन्ना येथून परतत असताना एका वेगवान डंपरने बोलेरो कारला समोरून जोरदार धडक दिली. यात 6 जण जागीच ठार झाले, तर एकाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक लोकांनी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातातील जखमींना सतना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अपघातावेळी बोलेरोमधून 12 जण प्रवास करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Related Stories

हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी अटकेत

datta jadhav

‘सप’वर भाजपचा काउंटर अटॅक

Patil_p

देशात ओमिक्रॉनचे आतापर्यंत 78 रुग्ण

Amit Kulkarni

पंजाब : तीन मजली इमारत कोसळली, सहा ते सात जण अडकल्याची भिती

prashant_c

उत्तराखंड : देशातील भाविकांसाठी चारधाम यात्रा सुरू

Rohan_P

ममता बॅनर्जी तिसऱयांदा मुख्यमंत्रिपदी विराजमान

Patil_p
error: Content is protected !!