तरुण भारत

ऑनलाईन फार्मा उद्योगावर टाटाचे लक्ष्य

1 एमजी कंपनीतील हिस्सा घेण्याची तयारी : 10 कोटींची गुंतवणूक शक्य

वृत्तसंस्था/ बेंगळूर

Advertisements

ई ग्रोसरीनंतर टाटा ग्रुप आता ऑनलाईन फार्मा उद्योगात उतरण्याची तयारी करत असल्याची बातमी आहे. सूत्रांच्या माहितीनुसार टाटा समूह गुरगावमधील  ई फार्मा कंपनी 1 एमजी यातील वाटा खरेदी करण्याचा विचार करत असल्याचे सांगण्यात येत आहे.

यासंदर्भात दोन्ही कंपन्यांमध्ये प्राथमिक स्वरूपाची चर्चा सुरू असल्याचे सूत्रांकडून समजते. सदरच्या कंपनीमध्ये टाटा समूह वाटा खरेदी करण्याच्या माध्यमातून 10 कोटी रुपये गुंतवणार असल्याचे सांगण्यात येत आहे. याच दरम्यान ई ग्रोसरी कंपनी बिगबास्केटमधील 50 टक्के वाटा खरेदी करण्यासाठीचा प्रयत्नही जोर धरू लागला आहे.

1 एमजी यातील हिस्सा खरेदीनंतर टाटा समूह ई फार्मा उद्योगाच्या विस्तारासाठी नेटाने प्रयत्न करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यापूर्वी रिलायन्स रिटेलने ई फार्मसी क्षेत्रातील नेटमेडसमध्ये 60 टक्के वाटा खरेदी केला आहे. त्याचप्रमाणे ऍमेझॉन आणि फ्लिपकार्ट यांनीही या क्षेत्रात उतरण्याचे निश्चित केले आहे. त्यामुळे फार्मसी क्षेत्रातील स्पर्धा येणाऱया काळात अधिक वाढताना दिसली तर नवल वाटायला
नको.

ई फार्मसी क्षेत्रात 4 कंपन्या  कार्यरत ई फार्मसी क्षेत्रांमध्ये नेट मेड, फार्मइझी, मेडलाइफ आणि वन एमजी या चार ऑनलाइन औषध कंपन्या कार्यरत आहेत.

Related Stories

रेस्टॉरन्ट उद्योगाची एकजूट ऑनलाईन फूट डिलिव्हरी प्लॅटफॉर्मच्या तयारीत

Patil_p

बँकिंगच्या कामगिरीने बाजारात तेजीची लाट

Patil_p

स्विगीच्या कर्मचाऱयांना कामामध्ये सवलत

Amit Kulkarni

मायक्रोसॉफ्टची ‘टीम्स’ची सुधारित सेवा

Omkar B

कल्याण ज्वेलर्सचा आयपीओ 16 मार्चला

Amit Kulkarni

सौर ऊर्जा उत्पादन क्षमता 12 पटीने वाढली

Patil_p
error: Content is protected !!