तरुण भारत

मुख्यमंत्र्यांनी दिल्लीत घेतल्या अनेक केंद्रिय मंत्र्यांच्या भेटी

प्रतिनिधी/ पणजी

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल सोमवारी आपल्या दिल्ली भेटीत काही केंद्रिय मंत्र्यांची भेट घेऊन गोवा राज्याशी संबंधित अनेक विषयांवर चर्चा केली. केंद्रिय मच्छीमारी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसायमंत्री शांडिल्य गिरीराज सिंह यांची भेट घेतली आणि गोव्यात दुग्ध उत्पादन तसेच मासळी उत्पादनात कशी वाढ करता येईल, याबाबत विचारविनिमय केला.

Advertisements

पर्यटन व सांस्कृतिकमंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांनाही मुख्यमंत्री भेटले. गोव्यात पर्यटक वाढीसाठी केंद्राने मदत करावी, अर्थसहाय्य द्यावे अशी मागणी त्यांच्याशी केली. त्यांनी सांस्कृतिक पर्यटन वाढीसाठी गोव्यात भरपूर वाव असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिले. आगामी 60 व्या गोवा मुक्तीदिनी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी यावे असे निमंत्रणही पटेल यांना दिले आणि त्यांनी ते स्वीकारले आहे.

मुख्यमंत्र्यांनी ट्रायबल फेडरेशनचे व्यवस्थापकीय संचालक प्रवीर कृष्णा यांचीही भेट घेतली आणि गोव्यातील आदीवासी लोकांकरीता विविध योजना कशा राबवता येतील याविषयी चर्चा केली. प्रधानमंत्री जनधन योजनेवर विशेष लक्ष देण्यात येणार असून ती योजना राज्यातील सर्व आदिवासी लोकांपर्यंत पोहोचावी म्हणून प्रयत्न करण्यात येत असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी त्यांना दिली.

Related Stories

कोमुनिदाद जमिनीवरील अतिक्रमणात काही भागधारकांचा हात

Omkar B

जिल्हा पंचायत सदस्यासाठी विकासासाठी 70 लाखावरून 1 कोटीपर्यंत निधी द्यावा

Patil_p

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाचे प्रफुल्ल पटेल यांच्याहस्ते उद्घाटन

Patil_p

केरी सत्तरी येथे घरातील सिलिंडरला आग.

Omkar B

मडगाव पालिका कर्मचाऱयांचा बोनस प्रश्न चिघळला

Amit Kulkarni

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 14 रोजी गोव्यात

Amit Kulkarni
error: Content is protected !!