तरुण भारत

निर्यात क्षेत्रात परतले अच्छे दिन

पहिल्या आठवडय़ात निर्यातीत 22.47 टक्क्यांची वृद्धी

नवी दिल्ली

 मागील काही दिवसांपासून कोरोना संकटामध्ये घसरणीचा प्रवास करणारे निर्यात क्षेत्र काही प्रमाणात सावरत असल्याचे संकेत पहावयास मिळत आहेत. चालू महिन्यातील पहिल्या आठवडय़ात 6.75 अब्ज डॉलर्सची निर्यात झाल्याची नोंद केली आहे. जी वर्षाच्या आधारे 22.47 टक्क्यांची वाढ दर्शवत आहे.

प्रामुख्याने सदर निर्यातीमध्ये औषध, रत्नांसह आभूषणे आणि इंजिनिअरिंग क्षेत्राचे मजबूत योगदान मिळाल्याची माहिती मंगळवारी एका अधिकाऱयाने दिली आहे. एक वर्षाच्या अगोदर नोव्हेंबर महिन्यातील पहिल्या आठवडय़ात 5.51 अब्ज डॉलर्सवर निर्यात राहिली होती. परंतु चालू नोव्हेंबरमध्ये यामध्ये 1.25 अब्ज डॉलर्सची वृद्धी नोंदवण्यात आली आहे.

नोव्हेंबर 2020 च्या 1 ते 7 तारखेदरम्यान आयात 13.64 टक्क्यांनी वाढून 9.30 अब्ज डॉलर्सवर राहिली आहे. जी एक वर्षाच्या समान कालावधीत 8.19 अब्ज डॉलर्सवर स्थिरावली होती. आयातीमध्ये पेट्रोलियम सोडून अन्य साहित्याची आयात 23.37 टक्क्यांनी तेजीत राहिली आहे.

Related Stories

‘कन्झ्युमर गूड्स’चा ‘दांडिया’!

Omkar B

केयर्न ऑईलमधील 20 टक्के हिस्सेदारी वेदान्ता विकणार

Patil_p

चीनी मालाला टक्कर देण्यासाठी सरकारची जय्यत तयारी

Patil_p

मागील वर्षी जगात 9 लाख नवीन पॉडकास्टची सुरुवात

Patil_p

महिंद्रा आणि महिंद्राची कोरोनासाठी मदत

Patil_p

शेअर बाजाराचा तेजीचा प्रवास कायम

Patil_p
error: Content is protected !!