तरुण भारत

दिवाळी वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याचे निर्देश

प्रतिनिधी/ सातारा

दिवाळी सणात वीज पुरवठा खंडीत होऊ नये यासाठी वीजपुरवठय़ाची पर्यायी व्यवस्था करून ठेवावी. नवीन वीजजोडणीच्या कामांना वेग देऊन पेडपेडींग असणाऱया घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीतील वीजजोडण्या दिवाळीपूर्वी कार्यान्वित कराव्यात असे निर्देश महावितरणचे पुणे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी दिले आहेत.

Advertisements

  पुणे प्रादेशिक विभागातील अधिकाऱयांसोबत नुकतीच व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे बैठक झाली. यामध्ये दिवाळीच्या कालावधीत वीजपुरवठा सुरळीत राहील. यासाठी पुणे, सातारा, सोलापूर, सांगली व कोल्हापूर जिह्यातील अभियंता व कर्मचाऱयांनी सज्ज व सतर्क राहण्याच्या सूचना प्रादेशिक संचालक नाळे यांनी दिल्या आहेत.

महावितरणची वीजयंत्रणा ही सार्वजनिक ठिकाणी आहे. यात उच्च व लघुदाबाच्या उपरी वीजवाहिन्या, रोहित्र, फिडर पिलर आदी यंत्रणा उघडय़ावर असल्याने फटाके फोडताना त्यापासून सुरक्षित अंतर ठेवावे. फटाक्यांच्या आतषबाजीत सार्वजानिक वीजयंत्रणेला आगीचा धोका निर्माण होणार नाही यांची काळजी घ्यावी. रोहित्र, फ्यूज पेटय़ा, फिडर पिलर, रिंग मेन युनिटजवळ फटाके फोडू नयेत किंवा त्याठिकाणी कोणत्याही प्रकारचा कचरा टाकू नये अथवा तो जाळू नये. वीजवाहिन्यांना स्पर्श होईल किंवा धोका निर्माण होईल असे रॉकेटसारखे फटाके वाहिन्यांखाली उडवू नयेत. मोकळ्या जागेतच फटाके उडवावेत. वीजयंत्रणेला आग लागल्यास, धोका निर्माण झाल्यास, वीजपुरवठा खंडित झाल्यास महावितरणच्या 24 तास सुरू असणाऱया कॉल सेंटरच्या किंवा 1012 या टोल फ्री कमांकावर सपर्क साधावा.

दिवाळी साजरी करताना घरगुती विद्युत उपकरणांपासून सतर्क राहावे. घराच्या किंवा इमारतीच्या रोषणाईसाठी दिव्यांची विद्यृत माळ चांगल्या दर्जाची असल्याची खात्री करून घ्यावी. या विद्यृत माळेचे वायर, दिवे, सॉकेट दर्जेदार नसल्यास धोका निर्माण होऊ शकतो. घर किंवा इमारतीचे अर्थिंग योग्य असल्याची तपासणी करावी. घराबाहेर आकाशदिवा लावताना तुटलेल्या वायरचा वापर टाळावा किंवा तुटलेली वायर चांगल्या दर्जाच्या इन्सूलेशन टेपने सुरक्षित करून घ्यावी. घरगुती उपकरणांसह विद्युत माळेपासून सुरक्षित अंतरावर वातीचे दिवे लावावेत. असे आवाहन करण्यात आले.

Related Stories

खोटे बोलून रस्त्यावर फिरणाऱयांना युवकांना चोप

Patil_p

सातारा : वाईच्या तरुणांची धोम बलकवडी धरणाला सायकलवरून प्रदक्षिणा

Abhijeet Shinde

वाढ उच्चांकीच, थोडी कमी असल्याचा दिलासा

datta jadhav

कराडात सहा तास हाय होल्टेज ड्रामा

Patil_p

साताऱ्यात भुरट्या पेट्रोल चोरांचा रात्रीस खेळ चाले

Abhijeet Shinde

गुरुदत्त कारखान्यासमोर शेकडो परप्रांतीय कामगारांचा मोर्चा

Abhijeet Shinde
error: Content is protected !!