तरुण भारत

पतित पावन संघटनेतर्फे पूर्व भागात आरोग्य तपासणी शिबीर

ऑनलाईन टीम / पुणे :

पतित पावन संघटना, स्व-रूपवर्धिनी, आरोग्य भारती, समर्थ भारत पुनर्बांधणी योजना व ए.एस.जी.आय. हॉस्पिटल यांच्यातर्फे गुरुवार पेठेत मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. शिबीरात सुमारे 400 नागरिकांनी सहभाग घेतला होता.

Advertisements


राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कसबा भाग संघचालक प्रशांत यादव, सुनील दाभाडे, हेमंत किराड, मंगेश शिंदे, नरेश आडेप, उमेश चव्हाण, किशोर राजपूत, प्रमोद राणा, रवींद्र बैताडे यांसह संघटनेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. राजाभाऊ राजपूत, स्वप्निल नाईक, अमित राजपूत, रोहित बलवार, मनीष खेडेकर, रुपेश गाढवे,ओंकार राजपूत, सागर बलवार, सचिन राजपूत व महेश बलवार यांनी शिबीराचे आयोजन केले होते. 


शिबिरात सर्दी, खोकला, ऑक्सिजन पातळी, डोळे, रक्तदाब, मधुमेह, वजन व रक्त तपासणी करण्यात आली. तसेच गरजेनुसार होमिओपॅथी गोळ्या आणि काढा देखील देण्यात आला. सन 2020 व 2021 वर्षात कोरोनासारख्या संसर्गजन्य रोगापासून बचावासाठी या शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. 

Related Stories

महाराष्ट्रात गुरुवारी 8 हजार पेक्षा अधिक रुग्णांना डिस्चार्ज!

Rohan_P

चिंता वाढली : देशात सर्वाधिक ओमिक्रॉनबाधितांची संख्या महाराष्ट्रात

Sumit Tambekar

शासनाने घालून दिलेले नियम मोडल्यास खैर नाही – पो. नि. गिरीगोसावी

Abhijeet Shinde

डॉ. धनंजय दातार अब्जाधीश भारतीयांच्या यादीत आठव्या क्रमांकावर

Abhijeet Shinde

पुणे विभागातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या 4 लाखांच्या उंबरठ्यावर

Rohan_P

कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी रोगप्रतिकार शक्ति वाढवा : रामदेव बाबा

Abhijeet Shinde
error: Content is protected !!