तरुण भारत

सांगली : ताकारी योजनेची विकासकामे ठप्प

मुख्य अभियंताची नेमणुक करण्याची मागणी

देवराष्ट्रे/ वार्ताहर

Advertisements

 कडेगाव, पलुस सह खानापूर तासगांव या दुष्काळी तालुक्यांंना नवसंजीवनी ठरलेल्या ताकारी उपसा सिंचन योजनेची विकासकामे ठप्प झाली असुन योजना सुरळीत चालण्यासाठी  कायमस्वरूपी कार्यकारी अभियंत्याची  नेमणुक करा” अशी मागणी शेतकरी वर्गातुन होत आहे.

ताकारी योजनेची मुहूर्तमेढ़ 1984 साली रोवण्यात आली.    2002 साली या योजनेच्या मुख्य  कालव्यातुन प्रत्यक्षात  पाणी  वाहू लागले. नंतरच्या काळात मुख्य कालव्यासह पोटपाटांची कामे टप्याटप्याने करण्यात आली.त्यामुळे योजनेच्या कार्यक्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

सध्या या योजनेची मोठ्या प्रमाणात कामे सुरू आहेत. याचबरोबर  रब्बी हंगामही सुरू झाला आहे. त्यामुळे ताकारीच्या प्रशासनाला आवर्तनाची तयारी करावी लागणार आहे. योजनेचे तत्कालीन कार्यकारी अभियंता प्रकाश पाटील  यांना बढ़ती मिळाल्याने त्यांची बदली झाली आहे. त्यामुळे 23 आक्टोबरपासुन योजनेचा अतीरिक्त कार्यभार कुमार पाटील यांच्याकडे आहे. पाटील यांच्याकडे म्हैसाळ  व ताकारी या दोन योजनेचा कार्यभार आहे.  पाटील हे ताकारी  योजनेला  वेळ देत नसल्याचे समजते. याचा ताकारीच्या विकासकामांवर परीणाम झाला आहे.त्यामुळे  योजनेस कायमस्वरूपी कार्यकारी अभियंत्याची  नेमणुक करावी  अशी शेतकरी वर्गातुन मागणी होत आहे.

Related Stories

नवे चार पॉझिटिव्ह, बरे होणाऱ्यांचे शतक पूर्ण

Abhijeet Shinde

लग्नाच्या आमिषाने युवतीची सहा लाखांची फसवणुक ; हैद्राबादच्या युवकावर गुन्हा दाखल

Abhijeet Shinde

सांगली : इंधन दरवाढीच्या निषेधार्थ युवक काँग्रेसच्यावतीने आंदोलन

Abhijeet Shinde

कोल्हापूरच्या टॅक्सी चालकाचा व्होडिओ व्हायरल: मिरजेतील दोन वाहतूक पोलिसांच्या बदल्या

Abhijeet Shinde

इस्लामपुरातील विकास कामांसाठी ३ कोटी ४५ लाखांचा निधी

Abhijeet Shinde

इस्लामपुरात क्रिकेटच्या वादातून खून

Abhijeet Shinde
error: Content is protected !!