तरुण भारत

कोल्हापूर : मलकापूर शहरात वाहतूक कोंडीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर

शाहुवाडी / प्रतिनिधी
     मलकापूर शहरात 9 महिन्याच्या कालावधीनंतर पुन्हा एकदा वाहनांची गर्दी वाढू लागली आहे. मात्र बेशिस्तपणे रस्त्याच्या बाजूला गाडी पार्क करून जाणाऱ्यांची संख्या मात्र वाढू लागल्याने वाहतूक कोंडीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पुन्हा एकदा पोलिसांना कारवाईचा बडगा उगारावा लागणार असल्याचे चित्र दिसत आहे.
      गेल्या आठ ते नऊ महिने लॉकडाउन चा  कडक कालावधी होता सर्वत्रच कोरोना संक्रमणाची भीती होती या पार्श्वभूमीवर सर्वच स्तरावर सतर्कता घेतली होती मात्र आता काही दिवसापासून लॉक डाऊन शिथील झाले आहे आणि सर्वांनाच मोकळे मैदान मिळाल्यासारखे झाले आहे. माणसांची गर्दी त्यातच वाहनांची कोंडी अशा पुन्हा एकदा वाहतूक कोंडीच्या समस्येत मलकापूर शहर अडकू लागले आहे. आता ऊस तोडणी सुरू झाली आहे आणि शाळीनाका व पेरीड नाका या वळणावर च्या ठिकाणी कायमच वाहतूक कोंडी निर्माण होत आहे.
    बेशिस्त पार्किंग डोकेदुखी
मलकापूर शहरात भेडसावणाऱ्या वाहतूक कोंडीत महत्त्वाची भूमिका ठरत आहे. बेशिस्त वाहन पार्किंग धारकांची मलकापूर शहरात प्रवेश केल्यानंतर जागा मिळेल त्या रस्त्याच्या कडेला वाहन आरामात पार करून लॉक झाल्याची खात्री करून बाजारात फेरफटका व खरेदीसाठी जाणारे अनेक जण वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरत आहेत आता ऊस तोडणी सुरू झाली आहे. त्यातच काही दिवसात बॉक्साईट वाहतूक ही होणार आहे मुंबईला जाणाऱ्या खाजगी ट्रॅव्हल्सची  संख्याही वाढतच आहे मात्र शहरातील वाहतूक कोंडी चा होणारा हा प्रश्न थांबणार कधी असा प्रश्न सर्व नागरिकांच्या तून पुढे येतो आहे.

Related Stories

शेतकर्‍यांना मिळणार बांधावर खते

Abhijeet Shinde

संजय तेलनाडेच्या पुण्यात मुसक्या आवळल्या

Sumit Tambekar

जिल्हा परिषद शिक्षक बदली घोटाळ्याची चौकशी पूर्ण

Abhijeet Shinde

शिरोली दुमालात दुचाकींच्या धडकेत युवक ठार

Abhijeet Shinde

काळम्मावाडी धरणग्रस्त संघटनेच्यावतीने रास्ता रोको

Abhijeet Shinde

धामापूर येथे गव्याच्या हल्ल्यात एक जण जखमी

Abhijeet Shinde
error: Content is protected !!