तरुण भारत

‘लॉकडाउन’ 2020 मधील शब्द

कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी जगभरात लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनला (टाळेबंदी) कोलिन्स डिक्शनरी वर्ड ऑफ द ईयर-2020 घोषित केले आहे. डिक्शनरीनुसार लॉकडाउनला प्रवास, सामजिक संपर्क आणि सार्वजनिक ठिकाणी पोहोचण्यावर कठोर निर्बंध लादण्याच्या स्वरुपात नमूद करण्यात आले आहे. कोलिन्सच्या लँग्वेज कंटेंट सल्लागार हेलेन न्यूस्टेड यांनी भाषा जगाचा आरसा असून 2020 सालावर या महामारीचे सावट राहिल्याचे म्हटले आहे.  या यादीत कोरोना विषाणू शब्दही आहे. याच्या वापरात असाधारण स्वरुपात वार्षिक पातळीवर 35,000 पटीने वृद्धी झाली आहे. हा विषाणूच्या एखाद्या समुहाच्या स्वरुपात मांडण्यात आला आहे, जो कोविड-19 सह श्वसनयंत्रणेच्या संक्रामक आजारांचे कारण ठरतो.

Related Stories

पाकिस्तान गिलगिट, बाल्टीस्तानची स्वायत्तता रद्द करणार

datta jadhav

भारताला झुगारून नेपाळ संसदेने मंजूर केला वादग्रस्त नकाशा

Rohan_P

शरीरावर आग लावून होतो उपचार

Patil_p

युरोपमध्ये 30 हजारांपेक्षा अधिक बळी

Patil_p

यंदाच्या वर्षी न्यूयॉर्क मधील सर्व शाळा, कॉलेज बंद राहणार

Rohan_P

भारताकडे जगातील सर्वात मोठे पायदळ

tarunbharat
error: Content is protected !!