22 C
Belgaum
April 18, 2021
तरुण भारत

बोगस मतदार ओळखपत्र प्रकरणी पोलीस तपासाची होणार पडताळणी

बेंगळूर : पोटनिवडणुकीत राजराजेश्वरीनगर विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले भाजप आमदार मुनिरत्न यांना बोगस मतदार ओळखपत्र प्रकरणी उच्च न्यायालयाने दणका दिला आहे. 2018 मधील विधानसभा निवडणुकीत आढळून आलेल्या बोगस मतदार ओळखपत्रासंबंधी पोलीस चौकशीचा पडताळणी अहवाल सादर करण्यासाठी वरिष्ठ आयपीएस अधिकाऱयाची नेमणूक करण्याची सूचना न्यायालयाने दिली आहे.

बोगस मतदार ओळखपत्र प्रकरणाचा तपास पोलिसांनी योग्य पद्धतीने केलेला नाही. त्यामुळे हे प्रकरण सीबीआयकडे सोपविण्याची विनंती करून एन. आनंदकुमार आणि जी. संतोषकुमार यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. बुधवारी या याचिकेवर मुख्य न्यायाधीश अभय ओक यांच्या नेतृत्वाखालील विभागीय खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी न्या. अभय ओक यांनी प्रकरणाचा तपास योग्य पद्धतीने झाला आहे का?, याची पडताळणी करावी. त्याकरिता एक वरिष्ठ आयपीएस अधिकाऱयाची नेमणूक राज्य पोलीस महासंचालकांनी करावी. पडताळणी करून 15 डिसेंबरपूर्वी बंद लखोटय़ातून न्यायालयात अहवाल सादर करावा, अशी सूचना दिली. तसेच सुनावणी 18 डिसेंबरपर्यंत पुढे ढकलली.

Related Stories

बेळगावात संचारबंदी धर्तीवर लॉकडाऊन

tarunbharat

मतदार ओळखपत्रही आता डिजिटल

Patil_p

बंगालच्या किनारपट्टीवर धडकले ‘अम्फान’ चक्री वादळ

Omkar B

मोदींची लोकप्रियता रालोआला तारणार ?

Patil_p

मजुरांना घेऊन धावल्या सहा ट्रेन

datta jadhav

निर्यात वाढविल्यामुळे देशात लसींचा तुटवडा

Patil_p
error: Content is protected !!