तरुण भारत

पाक कसोटी संघाच्या कर्णधारपदी बाबर आझम

वृत्तसंस्था / कराची

पाक कसोटी संघाच्या कर्णधारपदी 26 वर्षीय बाबर आझमची नियुक्ती पाक क्रिकेट मंडळाने केली आहे. आता पाकच्या आगामी न्यूझीलंड दौऱयात होणाऱया कसोटी मालिकेत बाबर आझमकडे कर्णधारपदाची जबाबदारी असेल. क्रिकेटच्या तीन प्रकारात पाकचे नेतृत्व बाबर आझम करणार आहे. यापूर्वी अझहर अलीकडे पाक संघाचे कर्णधारपद होते पण अझहर अलीला डच्चू देण्यात आला.

Advertisements

पाक आणि न्यूझीलंड यांच्यात आयसीसीच्या विश्व कसोटी चॅम्पियन्सशीप स्पर्धेतील दोन सामने डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात खेळविले जाणार आहेत. उभय संघातील पहिली कसोटी 26 ते 30 डिसेंबर दरम्यान माऊंट माँगेनुई येथे तर दुसरी कसोटी 3 ते 7 जानेवारी दरम्यान ख्राईस्टचर्च येथे खेळविली जाणार आहे. 2020-21 च्या संपूर्ण आंतरराष्ट्रीय क्रिकेट हंगामासाठी पाक कसोटी संघाच्या कर्णधारपदासाठी पीसीबीकडून अझहर अलीला कदाचीत पाठेंबा मिळणार नसल्याचे संकेत मिळाले होते. पाक क्रिकेट क्षेत्रातील 35 वर्षीय अझहर अली हा सर्वात अनुभवी कसोटी क्रिकेटपटू म्हणून ओळखला जातो. त्याने आतापर्यंत 81 सामन्यांत पाकचे प्रतिनिधीत्व केले आहे. लाहोरमध्ये गेल्या मंगळवारी झालेल्या बैठकीमध्ये पीसीबीचे अध्यक्ष एहसान मणी यांच्याशी चर्चा केल्यानंतर पीसीबीने कर्णधार बदल करण्याचा निर्णय घेतला. अझहर अलीने 2015-2017 च्या कालावधीत वनडे संघाचेही नेतृत्व केले होते पण पाक संघाच्या खराब कामगिरीमुळे अझहर अलीने वनडे संघाचे नेतृत्व सोडण्याचा निर्णय घेतला होता.

गेल्यावर्षी आठ कसोटी सामन्यात अझहर अलीने पाकचे नेतृत्व केले होते.

 पण चालू उन्हाळी मोसमामध्ये पाकला इंग्लंड विरूद्धची मालिका गमवावी लागली होती. या मालिकेतील शेवटच्या कसोटीत अझहर अलीने शतक ठोकले होते. बाबर आझम हा गुणवत्ता असलेला नवा तरूण क्रिकेटपटू असून येत्या काही दिवसामध्ये तो पाकचा दर्जेदार कर्णधार म्हणून ओळखला जाईल, असा विश्वास पीसीबीचे अध्यक्ष मणी यांनी व्यक्त केला आहे.

आगामी न्यूझीलंड दौऱयासाठी पाक संघाची घोषणा चालू आठवडय़ाअखेर केली जाईल.

Related Stories

जलतरणात महाराष्ट्राला आणखी तीन सुवर्णपदके

Patil_p

पोर्तुगालच्या रोनाल्डोचा 750 वा गोल

Patil_p

चिनी प्रायोजक कायम ठेवल्याबद्दल आयपीएलविरुद्ध जनतेत संताप

Patil_p

रविचंद्रन अश्विनला पुनरागमनाची संधी?

Patil_p

नागपूरपेक्षाही कमी लोकसंख्या असलेल्या कोसोव्हाला 2 सुवर्ण!

Patil_p

मेलबर्न रेनिगेड्सशी उन्मुक्त चंद करारबद्ध

Amit Kulkarni
error: Content is protected !!